मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Porsche Accident : कल्याणी नगर अपघात प्रकरणी आलीशान पोर्शे कारची कंपनीच्या तज्ञांनी व पोलिसांनी केली तपासणी

Pune Porsche Accident : कल्याणी नगर अपघात प्रकरणी आलीशान पोर्शे कारची कंपनीच्या तज्ञांनी व पोलिसांनी केली तपासणी

May 28, 2024 06:28 AM IST

Pune Porsche Accident : कल्याणी नगर येथे अपघात प्रकरणी पोर्शे कंपनीचे अधिकारी आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी आज अपघात ग्रस्त गाडीची तपासणी केली. या गाडीत बिघाड असल्याचे विशाल अगरवाल यांच्या वकिलाने सांगितल्यावर ही तपासणी करण्यात आली.

कल्याणी नगर येथे अपघात प्रकरणी पोर्शे कंपनीचे अधिकारी आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी आज अपघात ग्रस्त गाडीची तपासणी केली.
कल्याणी नगर येथे अपघात प्रकरणी पोर्शे कंपनीचे अधिकारी आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी आज अपघात ग्रस्त गाडीची तपासणी केली.

Pune Porsche Accident : पुण्यातील कल्याणी नगर येथील अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे. पुण्यातील नामांकित बिल्डर विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत आलीशान पोर्शे गाडी चालवत दोघांना उडवले होते. दरम्यान, या प्रकरणी आरोपी मुलाची बालगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर आरोपीचे वडील आणि आजोबा यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, विशाल अगरवाल यांच्या वकिलाने गाडीमध्ये तांत्रिक अडचण असल्याचे सांगितले होते. यामुले आज पोर्शे कंपनीचे कर्मचारी आणि पुणे वाहतूक पोलिसांनी या गाडीची तपासणी केली असून यात कोणताही दोष आढळला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणी अजितदादांचा आमदार गोत्यात! ससुनच्या 'त्या' डॉक्टरची केली होती शिफारस, पत्र व्हायरल

पुण्यात कल्याणी नगर येथे अपघात ग्रस्त कारची नोंदणी करण्यात आली नसल्याची माहिती तपासात उघड झाली होती. दरम्यान, या कारची नोंदणी का गेली नाही असा प्रश्न आरटीओ अधिकाऱ्यांना विचारला असता, गाडीत तांत्रिक अडचण असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सोमवारी पोर्शे कंपनीचे कर्मचारी व आरटीओचे अधिकारी यांनी या अपघात ग्रस्त कारची तपासणी केली. आरोपीचे वकील यांनी देखील कार बद्दल जास्त माहिती नसल्याचे सांगत, कारमध्ये अनेक तांत्रिक बिघाड असल्याचे कोर्टात सांगितले.

Asaduddin Owaisi on Modi : "तुम्ही चीनसोबत डिस्को डान्स करत आहात', पंतप्रधान मोदींच्या ‘मुजरा’ वर ओवैसींचा पलटवार

अगरवाल यांच्या वकिलांणी युक्तीवाद केल्यावर या कारची तपासणी आरटीओला करावी लागली. आरटीओचे अधिकारी तसेच पोर्शे कंपनीचे कर्मचारी कारमध्ये तांत्रिक बिघाड आहे का नाही हे पाहण्यासाठी दाखल झाले होते. येरवडा पोलिस ठाण्याच्या आवारात दोन्ही अपघातग्रस्त गाड्या ठेवण्यात आल्या आहेत. या खटल्यात पोर्शे कार महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे पोलिसांनी या कारच्या चारही बाजूने सुरक्षा बॅरिकेट्स लावले आहे. तसेच या ठिकाणी पोलिस कर्मचारी देहिल तैनात ठेवण्यात आले आहेत.

कारमध्ये आढळला नाही तांत्रिक दोष

पोर्शे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या गाडीची तपासणी केली. या वेळी वाहतूक पोलिस देखील उपस्थित होते. या कारमध्ये तांत्रिक बिघाड होता तर ही कार रस्त्यावर कशी आली? या कारला परवानगी कुणी दिली? या कारवर रजिस्ट्रेशन नंबर नव्हता या सारख्या अनेक प्रश्नाची उत्तरे सध्या पोलिस शोधत आहेत. या कारची तपासणी झाल्याचा अहवाल आरटीओ पुणे पोलिसांना देणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग