Pune Accident : भरधाव कंटेनर कारला जाऊन धडकला, दोन्ही वाहनांचा चक्काचूर, चौघे जण.....
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident : भरधाव कंटेनर कारला जाऊन धडकला, दोन्ही वाहनांचा चक्काचूर, चौघे जण.....

Pune Accident : भरधाव कंटेनर कारला जाऊन धडकला, दोन्ही वाहनांचा चक्काचूर, चौघे जण.....

Dec 01, 2024 03:41 PM IST

Pune Accident : पुणे-सातारा महामार्गावरील देगाव फाट्यावर भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने एका कारला जोरदार धडक दिली. या घटनेत कारचा व कंटेनरचा चक्काचूर झाला आहे.

भरधाव कंटेनर कारला जाऊन धडकला, दोन्ही वाहनांचा चक्काचूर
भरधाव कंटेनर कारला जाऊन धडकला, दोन्ही वाहनांचा चक्काचूर

Pune Accident News : पुणे-सातारा मार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भरधाव कंटेनरने एका कारला धडक दिली आहे. या अपघातानंतर कंटेनर व कार पुलाच्या मध्यभागी अडकून पडले होते.  या अपघातात कारचा चुराडा झाला. ही घटना देगाव फाट्यावर घडली. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही. मात्र, कारमधील चौघे जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे-सातारा महामार्गावरील देगाव फाट्यावर पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून साताऱ्याकडे एक कंटेनर हा भरधाव वेगात जात होता. यावेळी चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने तो कंटेनर कारला जाऊन धडकला. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. घटनेनंतर कार थेट पुलाच्या मध्यभागी जाऊन अडकली. यामुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

सुदैवाने या घटनेत कुणाचा जीव गेला नाही. मात्र, चौघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. जखमी नागरिकांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. जखमींची नावे समजू शकली नाही. राजगड पोलिसांनी घटनास्थळी जात अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. तसेच वाहतूक कोंडी देखील सुरुळीत केली.

नाशिक-मुंबई महामार्गावर बसचा भीषण अपघात; २० जखमी

मुंबई नाशिक महामार्गावर चेरपोली घाटात दोन प्रवासी बसचा अपघात झाला. या घटनेत २० प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिक वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका बसचा चेरपोली जवळ टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून ती बस डिवाइडवरला जाऊन धडकली. यावेळी या बसला बसला मागून येणाऱ्या दुसऱ्या बसने जोरदार धडक दिली. या दोन्ही बस एकाच कंपनीच्या आहेत. या बस नाशिकवरून मुंबईला जात होत्या. दोन्ही बसमध्ये तब्बल ८० प्रवासी होते. या पैकी २० जखमी झाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर