मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Porsche accident : पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलले; ससूनच्या दोन बड्या डॉक्टरांना अटक

Pune Porsche accident : पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलले; ससूनच्या दोन बड्या डॉक्टरांना अटक

May 27, 2024 09:40 AM IST

Two doctor of sasoon arrested in Pune Porsche accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी मुलाचे ब्लड रिपोर्ट ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी बदलण्यात आल्याचे उघड झाले असून या प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.

पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट डॉक्टरांनी बदलले; ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक
पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट डॉक्टरांनी बदलले; ससूनच्या दोन डॉक्टरांना अटक

Pune Porsche Car Accident Updates : गेल्या रविवारी कल्याणी नगर येथे झालेल्या अपघात प्रकरणी धक्कादायक घटना रोज उघडकीस येत आहे. एका बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात मद्यधुंद अवस्थेत आलीशान पोर्शेकार चालवून दोघांना उडवले होते. यात त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी ससुन रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र, हे रिपोर्ट ससुनच्या दोन डॉक्टरांनी बदलून त्यात फेरफार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना रविवारी रात्री अटक केल्याने खळबळ उडाली आहे. आतापर्यंत या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Malegaon news : मालेगावात माजी महापौरावर गोळीबार! हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी; तीन गोळ्या झाडल्या

ससूनमधील डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरलोर अशी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांचीनावे आहेत. या दोघांनी आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात १९ मेच्या रात्री कल्याणीनगर भागात बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने त्याच्या आलीशान पोर्शे कारने २ आयटी इंजिनिअर तरुणांना पाठीमागून उडवले होते. यात दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, अपघात झाल्यावर अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट हा ससुन रुग्णालयात पाठवण्यात आला होता. हा रिपोर्ट ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हर्सूल या दोघांनी बदलल्याचे पोलिस तपसात उघड झाले आहे. मुलाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना पैशांचे आमिष दाखवून रिपोर्ट बदलला.

Jitendra Awhad: शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती समावेशास विरोध; जितेंद्र आव्हाड महाडमध्ये करणार मनुस्मृतीची होळी

आरोपीच्या डीएनए टेस्टमुळे ससूनचे बिंग फुटले

डॉक्टर अजय तावरे आणि चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर श्रीहरी हरलोल यांच्या विभागात आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र, आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात दारूचा अंश येऊ शकतो हे लक्षात आल्यावर ते बदलन्यात आले. दरम्यान, हे करण्यासाठी रजेवर असलेले डॉक्टर अजय तावरे यांनी आरोपीमुलाच्या रक्ताचे नमुने बदलायला सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच एका रुग्णाचे रक्ताचे नमुने हे टेस्टिंगसाठी देण्यात आले. मात्र पुणे पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने आणखी एका लेबला पाठवून डीएनए टेस्ट केल्याने ही प्रकरण पुढे आले.

सध्या या प्रकरणात बिल्डरच्या आरोपी अल्पवयीन मुलाला १४ दिवस बाल कारागृहात ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी मुलाचे वडील विशाल अग्रवाल व आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक केली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये विशाल अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल आणि अपघात झाला त्यावेळी गाडीत असलेला ड्रायव्हर यांची एकत्र चौकशी होणार आहे. त्यांच्यावर चालकाला गुन्हा त्याच्यावर घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग