मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident : पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात, अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या; ४८ गाड्यांचे नुकसान
नवले पुलावर अपघात
नवले पुलावर अपघात

Pune Accident : पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात, अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्या; ४८ गाड्यांचे नुकसान

20 November 2022, 22:37 ISTShrikant Ashok Londhe

Pune Accident : पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात झाला असून या विचित्र अपघातात तब्बल ४८ वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी सर्वत्र ऑइल पसरले असून पुणे ते सातारा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

पुणे - पुण्यातील नवले पुलावर आज रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातामध्ये ४८ गाड्यांचे नुकसान झाल्याचे समजत आहे. ४८ गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती पीएमआरडीए अग्निशमन दलाने दिली आहे. अग्निशमन दलाच्या दोन रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी ऑईल पसरले असून रस्ता निसरडा झाला असून चालणेही अवघड आहे. आंध्र प्रदेशातून आलेल्या ट्रकने अनेक वाहनांना धडक दिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

खेड शिवापुर टोल नाका येथे संपर्क साधून तेथून ॲम्बुलन्स व इतर वाहने पाठविण्यात आली आहेत, तसेच वाहतूक वळविण्यात याली आहे. नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात आत्तापर्यंत एकूण ४८ वाहने समाविष्ट असल्याचे समजले असून तसेच पीएमआरडीए अग्निशमन दल बचावकार्य करत आहे. किमान १० जखमींवर शासकीय रुग्णवाहिका १०८ मध्ये उपचार केल्याची प्राथमिक माहिती आहे.

या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून घटनास्थळी धाव घेत काही नागरिकांच्या मदतीनं अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरु करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कंटेनरने धडक दिल्यामुळे या सर्व गाड्या एकमेकांवर आदळल्या असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात एकूण ४८ गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. दरम्यान या अपघातात अद्याप तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती आहे.

 

विभाग