मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident : 'त्या' मुलाच्या त्रासामुळे माझ्या मुलानं शाळा सोडली; पुणे अपघात प्रकरणी माजी मंत्र्याच्या पत्नीचं ट्विट

Pune Accident : 'त्या' मुलाच्या त्रासामुळे माझ्या मुलानं शाळा सोडली; पुणे अपघात प्रकरणी माजी मंत्र्याच्या पत्नीचं ट्विट

May 22, 2024 04:30 PM IST

Pune Car Accident: पुणे हीट अँड रन प्रकरणी रोज नवी अपडेट येत आहे. राष्ट्रवादीच्या नेते व माजी मंत्री प्राजक्त तनपूरे यांनी ट्विट केले असून या घटनेतील आरोपीच्या त्रासामुळे त्यांच्या मुलाला शाळा सोडावी लागल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पुणे हीट अँड रन प्रकरणी रोज नवी अपडेट येत आहे. राष्ट्रवादीच्या नेते प्राजक्त तनपूरे यांनी ट्विट केले असून या घटनेतील आरोपीच्या त्रासामुळे त्यांच्या मुलाला शाळा सोडावी लागल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पुणे हीट अँड रन प्रकरणी रोज नवी अपडेट येत आहे. राष्ट्रवादीच्या नेते प्राजक्त तनपूरे यांनी ट्विट केले असून या घटनेतील आरोपीच्या त्रासामुळे त्यांच्या मुलाला शाळा सोडावी लागल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Pune Car Accident: पुण्यात शनिवारी मध्यरात्री एका बड्या बिल्डरच्या मुलाने पुण्यात मद्यधुंद अवस्थेत बेदरकार पणे गाडी चालवत दोघांना उडवले होते. या घटनेत अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच काही तासातच आरोपीला जामीन देखील मिळाला मात्र, या विरोधात सर्व सामान्य नागरिकांमध्ये रोष उमटल्यावर पोलिसांनी कारवाई करत सात जणांना अटक केली. तसेच आरोपी वेदांत अगरवालचे  वडील विशाल अगरवाल यांना देखील अटक केली. दरम्यान, आरोपी विरोधात जयंत पाटील यांचा भाचा आणि शरद पवार गटाचे आमदार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून सोनाली तनपुरे यांनी या अपघात प्रकरणातील मुख्य आरोपीवर गंभीर आरोप केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

SSC Board Result Date : बारावीचा निकाल लागला, दहावीचा कधी लागणार? शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिली माहिती

पुणे हीट अँड रन प्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. या प्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोप देखील झाले आहे. काल राहुल गांधी यांनी देखील काल व्हिडिओ पोस्ट करत मोदी सरकारवर टीका केली. असे असतांना आता सोनाली तनपूरे यांनी ट्विट करत गंभीर आरोप केले आहे. सोनाली तनपूरे यांनी या प्रकरणी आरोपीचे थेट नाव घेतले नसले तरी त्यांचा सर्व रोख हा बिल्डरच्या आरोपी मुलाकडे आहे.

Pune Water Cut on Friday : पुणेकरांनो पाणी जपून वापरा ! शुक्रवारी संपूर्ण शहरात पाणी पुरवठा राहणार बंद

सोनाली तनपुरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कल्याणीनगर येथील कार अपघातानंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र, योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही, असे सोनाली तनपूरे यांनी म्हटले आहे.

सोनाली तनपुरे यांनी लिहिले आहे की, या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्यांना त्यांच्या मुलाची शाळा बदलावी लागली. या घटनेचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर असून वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच शाळेने किंवा पालकांनी घेतली असती तर आज असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला नसता. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा, असे सोनाली तनपुरे यांनी म्हटले आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग