मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Wanwadi Accident: पुण्यात आणखी एक थरकाप उडवणारा अपघात; वानवडी इथं १४ वर्षांच्या मुलानं टँकर चालवत अनेकांना उडवलं!

Pune Wanwadi Accident: पुण्यात आणखी एक थरकाप उडवणारा अपघात; वानवडी इथं १४ वर्षांच्या मुलानं टँकर चालवत अनेकांना उडवलं!

Jun 29, 2024 09:32 AM IST

Pune Wanwadi Tanker Accident: पुण्यातील वानवडी परिसरात अल्पवयीन टँकर चालकाने अनेकांना धडक दिल्याची घटना उघडकीस आली. नागरिकांनी या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

पुण्यातील वानवडी येथे भीषण अपघात, टँकरची अनेकांना धडक
पुण्यातील वानवडी येथे भीषण अपघात, टँकरची अनेकांना धडक

Pune Accident News Today: पुण्यातील कल्याणीनगर येथे एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत दोघांना चिरडल्याची घटना ताजी असताना पुण्यात पुन्हा असाच एक अपघात घडला. पुण्यातील वानवडी परिसरात आज सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास अवघ्या १४ वर्षाच्या मुलाने टँकर चालवताना अनेकांना धडक दिल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर स्थानिक लोकांनी या अल्पवयीन टँकर चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वानवडी परिसरात कुस्ती प्रशिक्षक संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी दुचाकीने जात होते. त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. त्यावेळी अचानक मागून आलेल्या भरधाव टँकरने ढुमे यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत ढुमे यांच्या पत्नी खाली पडल्या. तर, दोन मुली टँकर खाली आल्या. सुदैवाने, त्यांना मोठी दुखापत झाली नाही. यानंतर संभाव्य अपघात रोखण्यासाठी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी टँकर अडवून अल्पवयीन चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलीस नमेकी कोणती कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

ट्रेंडिंग न्यूज

पुणे-बेंगळुरू महामार्गावर भरधाव ट्रकची धडक, १५ ठार

कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर भरधाव व्हॅनने रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात दोन मुलांसह पंधरा जण ठार झाले. तर, दोन जण जखमी झाले. हावेरीचे पोलीस अधीक्षक अंशुकुमार यांनी सांगितले की, सर्व मृत आणि जखमी शिवमोगा जिल्ह्यातील बद्रावती तालुक्यातील रहिवासी आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन ते घरी परतत होते. ब्यादगी तालुक्यातील गुंडेनहळ्ळी क्रॉसजवळ पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.

भाविकांनी सोमवारी कलबुर्गी जिल्ह्यातील चिंचोली येथील मायाक्कादेवी मंदिरात पूजा केली आणि नंतर महाराष्ट्रातील तुळजा भवानी मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर गुरुवारी बेळगावच्या सावदत्ती तालुक्यातील यल्लम्मा मंदिरात दर्शन घेऊन ते घरी परतत असताना हा अपघात घडला. महामार्गावर वाहन पार्क केल्याप्रकरणी बायडगी पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात तक्रार दाखल केली. रस्त्यावर मोठी वाहने उभी करणे हा गुन्हा असल्याने ट्रकचालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एसपी अंशुकुमार यांनी दिली.

 

WhatsApp channel
विभाग