मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident : पुण्यात चाललंय काय! भरधाव मर्सिडीजने दुचाकीस्वाराला चिरडले, जागीच मृत्यू

Pune Accident : पुण्यात चाललंय काय! भरधाव मर्सिडीजने दुचाकीस्वाराला चिरडले, जागीच मृत्यू

Jun 18, 2024 08:46 PM IST

Pune Accident : येरवड्यात भरधाव मर्सिडीज कारने एका दुचाकीस्वाराला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये ४१ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पुण्यात भरधाव मर्सिडीजने दुचाकीस्वाराला चिरडले
पुण्यात भरधाव मर्सिडीजने दुचाकीस्वाराला चिरडले

Pune Car Accident: पुण्यामध्ये अपघाताची मालिका सुरूच असल्याचे दिसत आहे. पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटनेचे पडसाद अजून उमटत असताना आता येरवड्यात भरधाव मर्सिडीज कारने एका दुचाकीस्वाराला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये ४१ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. येरवडा भागातील गोल्फ कोर्सजवळ ही घटना घडली.या अपघतामुळे पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे.

अपघातानंतर पुणे पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले.मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकातहा अपघात झाला.आलिशान मर्सिडीज बेंज गाडीखालीयेऊनएका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.स्थानिकांनीमर्सिडीज बेंजच्या चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यातदिले आहे.येरवडा पोलिसांनी संबंधित कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

केदार मोहन चव्हाण (वय ४१) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अघात जालेल्या मर्सिडीज चालकाला नंदू अर्जुन ढवळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणीसाठी त्याला रुग्णालयातनेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदार चव्हाण दुपारी एक वाजताच्या सुमारास येरवड्यातील गोल्फ कोर्स चौकातून दुचाकीने जात होते. यावेळी दुचाकी स्लिप झाल्याने केदार चव्हाण रस्त्यावर कोसळले. यावेळी पाठीमागून येणारी मर्सिडीज बेंज गाडी त्यांच्या अंगावरून गेली. गंभीर जखमी अवस्थेत चव्हाण यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला तसेच कार चालकाला ताब्यात घेतले.

पुण्यात २५ दिवसात ७० हून अधिक अपघात -

पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने पोर्शे कार भरधाव चालवून एका जोडप्याला चिरडून मारले होते. तेव्हापासून पुण्यात अपघातांची मालिका सुरूच असून त्या अपघातापासून म्हणजेच गेल्या २५ दिवसात जवळपास ७० हून अधिक अपघात झाले आहे. कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाने पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता तसेच याची चर्चा देशभर सुरू होती.

पुण्यातील वाढत्या अपघातांच्या घटनांसाठी वाहनांचा भरधाव वेग कारणीभूत ठरत आहे. हा वेगच पुणे करांच्या जीवावर उठला आहे. त्याचबरोबर नशेत वाहने चालवून अपघात झाल्याच्या घटना वाढल्या आहेत.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर