पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. भरधाव डंपर चालकाने पती-पत्नीला उडवून घटनास्थळावरून पळ काढाला आहे. कोलाड रस्त्यावर मुळशी तालुक्यातील भुकूम येथील गारवा हॉटेल समोर हा अपघात झाला आहे. मोटारसायकलीवरून निघालेल्या पती-पत्नीला डंपरने जोरदार धडक दिली. यात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. डंपरचालक फरार असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल काळू सुर्यवंशी आणि त्यांची पत्नी प्रिया (रा. लवळेफाटा) अशी अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. हा अपघात बुधवारी रात्रीच्या वेळी झाला. डंपर भुकूमवरून भूगावकडे चालला होता. तर सुर्यवंशी आपल्या मोटारसायकलीने भूगावरून भुकूमकडे चालले होते.
वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून डंपर चालक भरधाव वेगाने जात असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. डंपरच्या धडकेत मोटारसायकलीवरील पती-पत्नी गंभीर जखमी होऊन रस्त्यात पडले होते. मात्र त्यांना रुग्णालयात न नेता चालकाने पळ काढला. यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाले.
मृत अनिल सूर्यवंशी उरवडे रोडवरील खासगी कंपनीत नोकरी करत होते. तसेच पत्नी प्रिया भूगाव येथील क्वूरिफायर कंपनीत कामाला होती. पुण्यातील गणपती पाहण्यास प्रिया कंपनीतील सहकाऱ्यांसोबत गेली होती. तेथून रात्री गणपती दर्शन घेऊन परतल्यावर पती अनिल तिला घेऊन भूगाव येथून लवळेफाटा येथील घरी चालले होते. त्यावेळी हा अपघात झाला आहे. रात्रीच्या वेळी जाताना दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पोलीस फरार डंपर चालकाचा शोध घेत आहेत.
गणेश उत्सवातून घरी परतणाऱ्या १० वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना पालघरमध्ये घडली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीला २ सप्टेंबर रोजी पहाटे नाला सोपारा येथील निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून दोषींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने ६ सप्टेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर राहुल गेंडे (४१) आणि शाहू ऊर्फ लंबू (३५) या दोघांवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि पोक्सो कायद्यान्वये सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या