मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात पुन्हा हिट अँड रन ! १५ वर्षांच्या मुलीनं भरधाव पिकअपखाली दोघांना चिरडलं, तरुणाचा जागीच मृत्यू

पुण्यात पुन्हा हिट अँड रन ! १५ वर्षांच्या मुलीनं भरधाव पिकअपखाली दोघांना चिरडलं, तरुणाचा जागीच मृत्यू

Jun 01, 2024 03:52 PM IST

Pune Accident : शिरुर तालुक्यातही एका अल्पवयीन मुलीनं एका तरुणाला चिरडल्याची घटना घडली आहे.१५वर्षीय मुलीनं पिकअप चालवताना बाईकला धडक दिली. त्यात३०वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला

मुलीनं भरधाव पिकअपखाली दोघांना चिरडलं (सांकेतिक छायाचित्र)
मुलीनं भरधाव पिकअपखाली दोघांना चिरडलं (सांकेतिक छायाचित्र)

Pune Accident : पुण्यात पोर्शे कार अपघाताची जोरदार चर्चा सुरू असतानाच पुन्हा एक तशीच घटना समोर आली आहे. शिरुर तालुक्यातही एका अल्पवयीन मुलीनं एका तरुणाला चिरडल्याची घटना घडली आहे. १५ वर्षीय मुलीनं पिकअप चालवताना बाईकला धडक दिली. त्यात ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

अरुण मेमाणे (वय ३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे तर महिंद्र बांडे असे जखमी तरुणाचे नाव आहे. 

अल्पवयीन मुलगी पिकअप चालवत होती. भरधाव वेगात गाडी चालवताना तिने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका गंभीर होता की, पिकअपनं बाईकसह चालकास २० ते ३० फुट फरफटत नेलं. या अपघातात बाईक चालक अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला तर महिंद्र बांडे हा गंभीर जखमी झाला आहे. धक्कादायक पिकअप व्हॅन मुलीला चालवायला देऊन वडील तिच्या शेजारीच बसले होते. या अल्पवयीन मुलीनं पिकअप भरधाव वेगात चालवून बाईकला उडवलं. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पुण्यात क्रेननं सायकलस्वार वृद्धाला चिरडलं -
दरम्यान पुण्यात आणखी एक भीषण अपघात झाला आहे. पुणे शहरातील कर्वे रोडवर एका क्रेननं सायकलस्वाराला चिरडलं. या दुर्घटनेत सायकलस्वार जागीच ठार झाला. या दुर्घटनेनंतर क्रेन चालक पसार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याला अटक केली. मृताचे नाव देवाली (६६ वर्षे) आहे. ते कोथरुडमध्ये रहात होते. सलीम अली असं अटक केलेल्या क्रेन चालकाचं नाव आहे.  देवाली हे रोजंदारीवर काम करत होते. ते आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कर्वे रोडवरून डेक्कनकडे जात असताना सोनाली हॉलजवळ ते क्रेनच्या चाकाखाली आले. क्रेन चालकाना मागे न पाहिल्याने त्यांनी क्रेन तशीच मागे घेतली. त्यात देवाली चिरडलं गेले.

दरम्यान, पुणे  पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची पुणे पोलिसांनी चौकशी केली. त्याच्या आईच्या उपस्थितीत तब्बल दीड तास ही चौकशी चालल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. 

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग