Pune Accident News Today: पुण्यातील नवले ब्रिजवर आज विचित्र अपघात घडला. कात्रजगावाकडून नवले पुलाकडे येणार्या रस्त्यावर ९ ते १० वाहने एकमेकांना धडकली.सकाळी ११ वाजता सुमारास हा अपघात घडला. या अपघात काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच सिंहरोड वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, नवले पुलाच्या सिग्नलच्या अगोदर एका ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने पाठीमागून पुढे असलेल्या वाहनाला जोरात धडक दिली. त्यानंतर पाठीमागून आलेल्या ९ ते १० वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात ५ कार, २ टेम्पो आणि एका एसटी बसचा समावेश आहे. या अपघातानंतर नवले ब्रिजवर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली.
अपघातामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, पोलिसांनी सक्षमपणे अपघातातील वाहने हटवली आणि जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्यानंतर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस अधिक तपास करीत आहे.
उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात आज भीषण अपघात घडला. गावकऱ्यांना गंगास्नानासाठी नदीकडे घेऊन जाणारी ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात कोसळल्याने १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. माघ पौर्णिमेच्या मुहूर्तावर महिला आणि लहान मुलांसह गावकरी पवित्र स्नानासाठी नदीकडे निघाले होते.