मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident : मुंबई बंगळुरू मार्गावर सारोळा जवळ लॅक्सरी ट्रॅव्हलरचा भीषण अपघात; सहा गंभीर

Pune Accident : मुंबई बंगळुरू मार्गावर सारोळा जवळ लॅक्सरी ट्रॅव्हलरचा भीषण अपघात; सहा गंभीर

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Oct 08, 2022 09:18 PM IST

Pune Accident : मुंबई-बंगळुरू मार्गावर आज पहाटेच्या सुमारास एका लॅक्सरी ट्रॅव्हलर गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले आहे. अपघातानंतर गाडी दुभाजक ओलांडून थेट सेवा रस्त्यावर जाऊन आदळली.

अपघातग्रस्त गाडी
अपघातग्रस्त गाडी

पुणे : : मुंबई-बंगळुरू मार्गावर आज साताराकडून पुण्याकडे जाणाऱ्या एका लॅक्सरी ट्रॅव्हलर गाडीचा सांरोळे गावाजवळ टायर फुटून भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की गाडीच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर ही गाडी दुभाजक ओलांडून थेट सर्विस मार्गावर जाऊन आदळली.

शमशादअल्ली अजमत तसेच अल्ली खान याचे डोके फुटले आहे. तर नाहिरा नुर अय्यमद, सुधीर संजय साळुंके, मानोज चैथीलाल जाटप, मारीया (पुर्ण नाव माहित नाही) अशी या अपघातात गंभीर जखमी आलेल्यांची नावे आहेत. ७० सीटर लक्झरी बस (गाडी क्रमांक.जी.ए.०७एफ.८९७५) ही सातारा मार्ग पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. यावेळी चालकाचे गडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूच्या दुभाजकावर चढली. यामुळे टायर फुटल्याने गाडी ही रस्त्याच्या विरुद्ध दिशेला पेट्रोल भरण्यासाठी थांबलेल्या तसेच पुण्यावरून बेंगलोर ला मार्गस्थ होणाऱ्या मालवाहतूक NTC लॉजिस्टिक्स कुरिअर कंपनीच्या एका गाडीवर समोरून धडकली. या अपघातामध्ये अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

सुदैवाने जीवितहानी होता होता टळली. शनिवारी सकाळी ७ च्या सुमारास सोरोळे गाव हद्दीमध्ये इंडियन पेट्रोल पंप जवळच ही घटना घडली. नागरिकांनी तातडीने मदतीसाठी ॲम्बुलन्स पाठवली. तसेच घटनास्थळावरील सर्व जखमी लोकांना पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी किकवी पोलीस चौकीचे सर्व वरिष्ठ, कनिष्ठ आधिकारी,कर्मचारी आणि राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग पोलीस कर्मचारी यांनी पंचनामा करून पुढील कायदेशीर बाबीची पडताळणी करण्याचे काम सुरू केलें.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग