मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivshahi Bus Accident : हडपसर-सासवड रस्त्यावर कंटेनर व शिवशाही बसचा भीषण अपघात; १ ठार, ६ जखमी

Shivshahi Bus Accident : हडपसर-सासवड रस्त्यावर कंटेनर व शिवशाही बसचा भीषण अपघात; १ ठार, ६ जखमी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 19, 2022 09:25 AM IST

Pune Bus Accident : हडपसर सासवड रस्त्यावर आपघातांची मालिका ही सुरूच आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास ऊरुळी देवाची परिसरात कंटेनर आणि शिवशाही बसचा भीषण अपघात झाला.

हडपसर सासवड रस्त्यावर अपघात
हडपसर सासवड रस्त्यावर अपघात

पुणे : हडपसर सासवड रस्त्यावर आपघातांची मालिका ही सुरूच आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास ऊरुळी देवाची परिसरात कंटेनर आणि शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर ६ प्रवाशी जखमी झाले आहेत. ही घटना सोनाई हॉटेलसमोर रात्री साडेबाराच्या सुमारास घडली.

या अपघात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी प्रवाशांची नावे सध्या समजू शकलेली नाहीत. पोलिसांनी देलेल्या माहितीनुसार पुणे सासवड रोड वरील उरळी देवाची फाट्याजवळ असलेल्या गोडाऊनमधून निघालेला कंटेनर हा सासवड रस्त्यावर येत होता. याचवेळी भरधाव वेगात पुण्याच्या दिशेने जात असेलल्या पंढरपूर-पुणे शिवशाही एसटी बस ही रस्त्यावर आडव्या झालेल्या कंटेनरला जोरदार धडकली. या अपघातात एसटी चालक व प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. एकाचा मृत्यू झाला असून पाच ते ६ प्रवाशी हे जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. शिवशाही बस (MH14 GO 3104) (पंढरपुर-स्वारगेट) व कंटेनर MH18 AA 7190 यांचा मोठा अपघात झाला असून दलाची मदत पोहोचण्यापूर्वी शिवशाही बसमधील ४ जखमींना नागरिकांनी बाहेर काढून जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवले होते. तर कंटेनर ड्रायव्हर यालादेखील रुग्णालयात रवाना केले होते. दलाच्या जवानांनी पाहणी केली असता शिवशाही बसमधे ड्रायव्हर सीटमागे एक जखमी व्यक्ती अडकला होता. त्याला बाहेर काढून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविले. अपघातग्रस्त वाहने ही क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली.

हडपसर सासवड मार्ग हा आपघातांचा रस्ता झाला आहे. या मार्गावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. या विरोधात नागरिकांनी आंदोलने ही केली. मात्र, अद्यापही येथील रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासणाला जाग आलेलेली नाही. यामुळे येथील अपघात हे सातत्याने वाढत आहेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग