Viral Video: धक्कादायक! पुण्यात पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून कार थेट खाली कोसळली; व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video: धक्कादायक! पुण्यात पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून कार थेट खाली कोसळली; व्हिडिओ व्हायरल

Viral Video: धक्कादायक! पुण्यात पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून कार थेट खाली कोसळली; व्हिडिओ व्हायरल

Jan 22, 2025 12:33 PM IST

Pune Accident: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सोसायटीत पार्किंगच्या पहिल्या मजल्यावरून एक कार खाली कोसळली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

धक्कादायक! पुण्यात पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून कार थेट खाली कोसळली; व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! पुण्यात पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून कार थेट खाली कोसळली; व्हिडिओ व्हायरल

Pune Accident: पुण्यात रोज काही ना काही घटना घडत असतात. अपघात हे तर नित्याचे झाले आहे. असाच एक अपघात एका सोसायटीत घडला असून याच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर कार पार्किंग करत असतांना अचानक ही कार पार्किंगची भिंत तोडून खाली कोसळली आहे. ही घटना रविवारी घडली आहे. सुदैवाने या अपघात कुणी जखमी वा मृत्युमुखी पडले नाही.

काय आहे घटना ?

पुण्यातील विमान नगर परिसरात एका सोसायतीत हा अपघात घडला आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून ही कार खाली कोसळली आहे. शुभ अपार्टमेंट या इमारतीत पहिल्या मजल्यावरील पार्किंगमध्ये रविवारी चालक हा गाडी मागे घेत होता. यावेळी त्याला मागच्या भिंतीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ही कार थेट खाली कोसळली.

या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल झाले आहे. शुभ अपार्टमेंट इमारतीच्या पहिल्या मजल्याची भिंत तोडून काळ्या रंगाची होंडा सिटी कार खाली पडताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. चालक कार पार्क करत असतांना हा अपघात झाला आहे. या चालकाला कार पुढे घ्यायची होती. मात्र, त्याने मागे घेतली. इमारतीच्या पार्किंगची भिंत कमकुवत असल्याने कारचा धक्का बसताच भिंत तुटून कार देखील खाली कोसळली. कारचा वेग जास्त नसल्यामुळे मोठा दुर्घटना टळली. कार खाली पडल्यानंतर गाडीतील लोक बाहेर पडले.

शेजारीच होता कामगार

सोसायटीत कसले तरी बांधकाम सुरू आहे. या साठी लागणाऱ्या सळया कापण्याचे काम एक मजूर करत होता. यावेळी त्याच्या पासून काही अंतरावर ही कार पडली. जर हा व्यक्ति थोडा पुढे असता तर कार थेट त्याच्या अंगावर कोसळली असती. सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस याप्रकरणात काही कारवाई करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर