Pune Accident : गॅरेजमध्ये उभ्या सीएनजी रिक्षामध्ये स्फोट; एकजण जागीच ठार, तीन जखमी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident : गॅरेजमध्ये उभ्या सीएनजी रिक्षामध्ये स्फोट; एकजण जागीच ठार, तीन जखमी

Pune Accident : गॅरेजमध्ये उभ्या सीएनजी रिक्षामध्ये स्फोट; एकजण जागीच ठार, तीन जखमी

Dec 27, 2024 08:33 PM IST

Pune Accident : पुण्यातील बी टी कवडे रोडवर फ्रीज गॅसचा स्फोट झाल्याने सीएनजी रिक्षाचा पार चक्काचूर झाला तर एकाला जीव गमवावा लागला.

पुण्यात सीएनजी रिक्षामध्ये स्फोट
पुण्यात सीएनजी रिक्षामध्ये स्फोट

पुण्यात एक भीषण अपघात झाला आहे. शहरातील बी टी कवडे रोडवर फ्रीज गॅसचा स्फोट झाल्याने सीएनजी रिक्षाचा पार चक्काचूर झाला तर एकाला जीव गमवावा लागला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. रिक्षा गॅरेजमध्ये उभी असताना सीएनजीचा अचानक स्फोट झाला. ही घटना शुक्रवारी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील बी.टी. कवडे रस्त्यावर  नवशा गणपतीपुढे भंगार गोळा केलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हा स्फोट झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट इतका भीषण होता की, रिक्षाचे पार्ट हवेत उडून पार चक्काचूर झाले तर रिक्षात बसलेल्या एकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या तिघांना रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास बी.टी. कवडे रोड येथील एका भंगाराच्या दुकानांमध्ये जुन्या फ्रिजच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेत एका व्यक्तिसा जीव गमवावा लागला आहे. तर इतर तीन व्यक्ति जखमी झाले आहेत. या जखमी व्यक्तींना कामी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळावर दाखल झाले असून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र हा अपघात नेमका कश्यामुळे झाला हे अद्याप कळू शकलेले नाही.

पुणे हादरले! दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार करून केली हत्या -

खेड तालुक्यातील राजगुरुनगर जवळील वडा रोड येथे दोन चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या बहिणींचे मृतदेह घरातील वरच्या मजल्यावर पाण्याच्या ड्रममध्ये आढळले. घरात भाड्याने राहणाऱ्या आचाऱ्याने या दोघींची हत्या केल्याचं उघडं झालं आहे. या आचाऱ्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपी आचाऱ्याने या दोन्ही मुलींना गोड बोलत वरच्या मजल्यावर नेले. या ठिकाणी त्याने मोठ्या बहिणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठ्या मुलीने याला विरोध करत ओरडण्यास सुरुवात केली. त्यामुळे बिंग फुटण्याच्या भीतीने आरोपी आचाऱ्याने मोठ्या मुलीचा गळा आवळून खून केला. ही घटना छोट्या बहिणीने पहिली. यामुळे त्याने तिचाही जीव घेतला.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर