मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident : पुण्यात अपघात सत्र सुरूच; मध्यरात्री दरी पुलावर ट्रेलर पलटी; दोन जखमींना अग्निशमन दलाने दिले जीवदान

Pune Accident : पुण्यात अपघात सत्र सुरूच; मध्यरात्री दरी पुलावर ट्रेलर पलटी; दोन जखमींना अग्निशमन दलाने दिले जीवदान

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 06, 2022 09:01 AM IST

Pune daripul Accident : पुण्यात आपघाचे सत्र काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाही. नवले पुला आधी असणाऱ्या जांभुळवाडी येथील दरी पुलावर पहाटेच्या सुमारास ट्रेलर पलटी झाला. या अपघातात अडकलेला वाहन चालक व अपघात पाहून भेदरलेल्या स्थितीत दरी पुलावरुन बचावासाठी खाली उडी मारलेला इसम अशा दोघांना अग्निशामक दलाने जीवदान दिले आहे.

पुण्यात अपघात सत्र सुरूच; मध्यरात्री दरी पुलावर ट्रेलरचा अपघात
पुण्यात अपघात सत्र सुरूच; मध्यरात्री दरी पुलावर ट्रेलरचा अपघात

पुणे : पुण्यात आपघाचे सत्र काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाही. नवले पुला आधी असणाऱ्या जांभुळवाडी येथील दरी पुलावर पहाटेच्या ३.३० च्या सुमारास कंटेनर पलटी झाला. या अपघातात कंटेनर चालक हा अडकून पडला होता. त्याला वाचवण्यासाठी एक दुचाकीस्वार थांबला. मात्र, कंटेनरने पेट घेतल्याने घाबरलेल्या अवस्थेत पूलाखाली या इसमाने उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जात कंटेनर चालकाला आणि दरी पूलावरून उडी मारलेल्या इसमळा जीवदान दिले.

जांभुळवाडी येथील दरी पूलावर एक मध्यरात्री ३.३० च्या सुमारास एक भरधाव कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर पलटी झाला. या अपघातात चालक का कंटेनरमध्ये अडकून पडला. दरम्यान, रस्त्यावर पलटी झालेला ट्रेलर पाहून एक दुचाकीस्वार रस्त्यावरून जात असताना त्याने हा अपघात पाहून मदतीकरिता पुढे आला असता त्या ट्रेलरने काही प्रमाणात पेट घेतल्याचे पाहताच मदतीसाठी पुढे आलेल्या दुचाकीस्वाराने घाबरुन स्वतचा बचाव करण्याकरिता दरीपुलावरुन खाली उडी मारली.

पुण्यात अपघात सत्र सुरूच; मध्यरात्री दरी पुलावर ट्रेलरचा अपघात
पुण्यात अपघात सत्र सुरूच; मध्यरात्री दरी पुलावर ट्रेलरचा अपघात

या घटनेची माहिती मिळताच सिहंगड अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले. घटनास्थळी जवान पोहोचताच जवानांना मोठा ट्रेलर पलटी होऊन पुढील केबिनमधे सीटवर चालक जखमी अवस्थेत अडकला असल्याचे दिसले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्या चालकाशी संवाद साधून त्याला धीर देत जवान शिवाजी मुजूमले व शिवाजी आटोळे यांनी तातडीने दलाकडील स्प्रेडर व कटर हे उपकरण वापरत तसेच एका क्रेनच्या मदतीच्या साह्याने जखमी चालकाला पंधरा मिनिटात जखमी अवस्थेत बाहेर काढले. त्याला उपचाराकरिता रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना केले. दरम्यान, दरी पूलावरून उडी मारलेल्या नगरिकाचा मदतीसाठी ओरडण्याचा आवाज ऐकल्यावर दलाचे जवान व तेथे उपस्थित नागरिक यांच्या मदतीने त्या दुचाकीस्वारास ही जखमी अवस्थेत वर काढण्यात आले. ट्रेलर क्रमांक एम एच ४६ - २९५० असा असून अपघाताचे नेमके कारण व दोन ही जखमींची नावे समजू शकली नाहीत. या अपघातामुळे रस्त्यावर वाहनातील तेल पडल्याने इतर वाहने घसरुन पडण्याची शक्यता असल्याने जवानांनी त्या ठिकाणी माती टाकून रस्ता स्वच्छ केला. आपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी ती काही वेळात दूर केली.

पुण्यात अपघात सत्र सुरूच; मध्यरात्री दरी पुलावर ट्रेलरचा अपघात
पुण्यात अपघात सत्र सुरूच; मध्यरात्री दरी पुलावर ट्रेलरचा अपघात

या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी प्रभाकर उम्राटकर व वाहनचालक ज्ञानेश्वर बाठे तसेच तांडेल - शिवाजी मुजूमले व फायरमन शिवाजी आटोळे आणि मदतनीस दिगंबर वनवे, कल्पेश बानगुडे, राजेंद्र भिलारे यांनी सहभाग घेतला. तसेच पीएमआरडीए अग्निशमन दल यांचे जवान ही मदतीकरिता दाखल झाले होते. पोलिस विभाग व उपस्थित असणारे नागरिक यांची ही मदत झाली.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग