Pune Katraj Accident : पुण्यात अपघातसत्र थांबेना! कात्रज चौकात एसटीच्या चाकाखाली येऊन तरुणी ठार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Katraj Accident : पुण्यात अपघातसत्र थांबेना! कात्रज चौकात एसटीच्या चाकाखाली येऊन तरुणी ठार

Pune Katraj Accident : पुण्यात अपघातसत्र थांबेना! कात्रज चौकात एसटीच्या चाकाखाली येऊन तरुणी ठार

Published Jun 16, 2024 07:44 AM IST

Pune Katraj Accident : पुण्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. चांदणी चौकात बसने धडक देऊन चार ते पाच वाहनांना उडवल्याची घटना ताजी असतांना शनिवारी रात्री बसने एका तरुणीला चिरडले.

पुण्यात अपघातसत्र थांबेना! कात्रज चौकात एसटीच्या चाकाखाली येऊन तरुणी ठार
पुण्यात अपघातसत्र थांबेना! कात्रज चौकात एसटीच्या चाकाखाली येऊन तरुणी ठार

Pune Katraj Accident : पुण्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. चांदणी चौकात बसने धडक देऊन चार ते पाच वाहनांना उडवल्याची घटना ताजी असतांना शनिवारी रात्री बसने एका तरुणीला चिरडले. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री ८.३० च्या सुमारास घडली.

श्वेता चंद्रकांत लीमकर (वय २५ मुळ रा.कोल्हापूर) असे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. पुण्यात अपघातसत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वीच कात्रज चौकामध्ये पीएमपीएलमखाली येऊन कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला होता. तर चांदणी चौकात देखील बसने धडक दिल्याने अपघात झाला होता. या दोन्ही घटना ताज्या असतांना शनिवारी रात्री पुन्हा एक अपघात झाला. या अपघतात तरुणीचा मृत्यू झाला आहे. कात्रज चौकामध्ये शनिवारीसव्वा आठच्या दरम्यान एसटीचादुचाकीला धक्का लागला व चाकाखाली येऊन कोल्हापूर येथील तरुणीचा मृत्यू झाला.

अपघातात मृत्युमुखी पडलेली श्वेता ही खेड शिवापुर येथील एका कंपनीत कामाला होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे व वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह दवाखान्यात पाठवला आहे. तर चालकाला अटक करण्यात आले. पुढील तपास भरती विद्यापीठ पोलिस करत आहेत.

हेल्मेट उडाले हवेत

या तरुणीने हेल्मेट घातले होते. मात्र, तिने हेल्मेटची क्लिप लावली नव्हती. यामुळे धडक बसल्यावर तिच्या डोक्यावरील हेल्मेट उडून गेले. परिणामी डोक्यावरून चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

नांदोशी येथी शुक्रवारी अपघात

नांदोशी येथे देखील अपघात झाला. एका डंपरने उडवल्याने युवकाचा मृत्यू झाला. संजय राजाराम बाबर (वय ५०, रा. जावळी जिल्हा सातारा) असे मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संजय बाबर हे नांदोशी येथील मनन आश्रम जवळ असणाऱ्या एका विहिरीचे काम करण्यासाठी आले होते. ते नांदोशी येथील मुख्य रस्त्यावरून चालत जात असताना, बाजूने चाललेल्या डंपरने त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर