kidney transplant for dogs: किडनीच्या आजारामुळे अनेक जण दगावत असतात. अनेक जण किडनी दानाच्या प्रतीक्षेत असतात. मात्र, मानवा प्रमाणेच प्राण्यांनाही किडनीचे आजर असून पुण्यातील ९ वर्षीय ब्रूनो नामक श्वनाला किडीनि दात्याची प्रतीक्षा आहे. त्याच्या डॉक्टरांनी किडनी दान करण्याचे आवाहन केले आहे.
ब्रुनो हा पुण्यातील एक ९ वर्षांचा लॅब्राडॉर प्रजातीचा श्वान आहे. ब्रुनो सध्या अनेक आरोग्यविषयक त्रासांना सामोरे जात आहे. त्याला मूत्रपिंड विकार असून यामुळे हृदयाची गती वाढणे, हिप डिसप्लेसिया आणि थायरॉईड सारख्या आजार देखील बळावले आहेत. यामुळे ब्रुनोच्या डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण सांगितले आहे. या साठी त्यांना दात्याची प्रतीक्षा आहे. सध्या ब्रुनोला डायलिसिस करावे लागत आहे.
या संदर्भात स्मॅाल ॲनिमल क्लिनीकचे डॅा नरेंद्र परदेशी म्हणाले, ब्रुनोवर किडनी प्रत्यारोपणासाठी दात्याच्या प्रतिक्षे असून लवकरात लवकर किडनी दाता उपलब्ध होईल अशी करतो. तर ब्रुनोचे पालक अनुत्तमा नायकवडी यांनी देखील किडनी दाणासाठी आवाहन केले आहे.
जेव्हा किडनी निकामी होते, तेव्हा कुत्र्यांना विषारी पदार्थ बाहेर टाकणे, अशक्तपणा आणि शारीरीक असंतुलनाचा त्रास होतो. याकरिता किडनी प्रत्यारोपण हा मार्ग उरतो. यासाठी प्राप्तकर्ता आणि दाता अशा दोन्ही कुत्र्यांची किडनी मॅच व्हावी लागते. यावेळी संबंधित आजारी प्राण्याला रक्त देखील लागू शकते. ही चाचणी झाल्यावर आयुष्यभर इम्युनोसप्रेसिव्ह औषधे घेणे आवश्यक आहे. कुत्र्यांच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेतील मुख्य आव्हान म्हणजे दात्याचा शोध घेणे. मानवांमध्ये सामान्यतः दोन किंवा तीन रक्तगट असतात, तर कुत्र्यांमध्ये १५ पेक्षा जास्त रक्तगट आढळून येतात. यामुळे दाता आणि प्राप्तकर्ता यांच्या रक्तगटांमध्ये सुसंगतता सुनिश्चित करणे अधिक आव्हानात्मक होते.
- दाता शक्यतो लॅब्राडोर असावा
- वय दोन ते सहा वर्षांच्या दरम्यान असावे.
- मागील सहा महिन्यांत लसीकरण झालेले आणि तापासारख्या कोणत्याही संसर्गाच्या वैद्यकिय इतिहास नसावा.
- अवयव नाकारण्याची शक्यता कमी करण्यासाठी रक्तगट आणि किडनी प्रोफाइल सारख्या महत्त्वाच्या क्लिनिकल पॅरामीटर्स जुळणे आवश्यक आहे.