Pune Gas leak : पिंपरी चिंचवडमध्ये एलपीजी सिलिंडरच्या गळतीमुळं घराला आग, ५ जण आगीत होरपळले!-pune 5 injured in explosion of leaked gas in pimpri chinchwad ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Gas leak : पिंपरी चिंचवडमध्ये एलपीजी सिलिंडरच्या गळतीमुळं घराला आग, ५ जण आगीत होरपळले!

Pune Gas leak : पिंपरी चिंचवडमध्ये एलपीजी सिलिंडरच्या गळतीमुळं घराला आग, ५ जण आगीत होरपळले!

Aug 21, 2024 04:04 PM IST

Pimpri Chinchwad Gas Leak: पुण्यात एलपीजी सिलिंडरच्या गळतीमुळे घराला आग लागल्याची घटना घडली. या आगीत ५ जण होरपळले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुण्यात एलपीजी सिलिंडरच्या गळतीमुळं घराला आग
पुण्यात एलपीजी सिलिंडरच्या गळतीमुळं घराला आग

Pune Gas explosion: पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) एलपीजी सिलिंडरच्या गळतीमुळे घराला लागलेल्या आगीत पाच जण होरपळल्याची माहिती समोर आली. पिंपरी चिंडवड येथील बौद्धनगर परिसरातील रहिवासी इमारतीत आज (२१ ऑगस्ट २०२४) पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पिंपरी पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पिंपरीतील एका निवासी इमारतीतील बुधवारी सकाळी एका घरात गॅस गळतीमुळे आग लागली. या घटनेत पाच जण होरपळले. जखमींवर पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. कनेक्टिंग पाईपमधून गॅस गळती झाल्याचा संशय आहे.' मनोज कुमार (वय,१९), धीरज कुमार (वय, २३), गोविंद राम (वय, २८), राम कुमार (वय, ४०) आणि समंदर राम (वय, ३०) अशी जखमींची नावे आहेत.

मुंबईत विमानाच्या सामानाच्या सुटकेसला भीषण आग

मुंबई विमानतळावर इथियोपियन एअरलाइन्सच्या विमानात काही केमिकल लोड करत असताना अचानक मोठी आग लागली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इथियोपियन एअरलाइन्सच्या विमानातील सामानाच्या सुटकेसमध्ये आग लागली. मुंबई पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतल्यानंतर इथिओपियन एअरलाइन्सच्या विमानात काही केमिकल भरले होते का? आणि आग कशामुळे लागली याचा तपास करत आहेत.

विमानात केमिकल भरताना आग

विमानात केमिकल भरत असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या घटनेत कोणाचीही हानी झाली नाही, हे सुदैवाने म्हणावे लागेल. फॉरेन्सिक टीमने केलेल्या तपासणीत विमानात भरण्यात आलेले रसायन हायड्रोजन स्पिरिट असल्याचे समोर आले. मुंबई विमानतळावरील ही घटना सुरक्षेतील मोठी त्रुटी मानली जात आहे. बेकायदेशीररीत्या वाहतूक करण्यात आलेला हायड्रोजन स्पिरिट मुंबईहून आदिस अबाबाला ईटी-६४१ या फ्लाइटने नेला जात होता. मात्र, या प्रकरणाचा आधीच पर्दाफाश झाला.

विभाग