मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Loksabha Election 2024: पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच होणार दोन टप्यात मतदान; महायुती महाविकास आघाडीत चुरशीचा सामना

Loksabha Election 2024: पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच होणार दोन टप्यात मतदान; महायुती महाविकास आघाडीत चुरशीचा सामना

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 17, 2024 09:03 AM IST

Pune 4 Lok Sabha Constituencies Election Date: राज्यात पाच टप्प्यात निवडणुका होत असून पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन टप्प्यात मतदान होणार आहे. बारामती आणि उर्वरित ३ मतदार संघासाठी दोन वेगवेगळ्या दिवशी मतदान होणार आहे.

पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच होणार दोन टप्यात मतदान
पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच होणार दोन टप्यात मतदान (HT)

Pune 4 Lok Sabha Constituencies Election Date: देशभारत लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यात पाच टप्प्यात मतदान होणार असून १९ एप्रिल ते २० मे दरम्यान मतदान होणार आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात पाहिल्यांच दोन टप्प्यात मतदान होणार आहे. बारामतीत ७ मे रोजी तर मावळ, शिरूर, पुणे लोकसभा मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे.

मतदार यादीत नसल्यास मतदानाच्या हक्काला मुकाल! लगेचच ऑनलाइन तपासा, ही आहे पद्धत; वाचा

पुणे जिल्ह्यातील चार मतदार संघात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. सर्व भारताचे लक्ष लागून असलेल्या बारामती मतदार संघासाठी पाहिल्यांना स्वतंत्र तारखेला मतदान होणार आहे. बारामतीमध्ये घरातच रंगणाऱ्या लढतीसाठी ७ मे रोजी तर पुणे, मावळ, शिरूर या लोकसभा मतदारसंघांसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. भर उन्हात या चारही लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. दरम्यान, ४ जून रोजी निकाल जाहीर होतील.

Maharashtra weather update: विदर्भात आज गारपीटीची शक्यता! 'या' जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अधिकारी गुंतले राहणार आहे. मतदान दोन टप्प्यात होणार असल्याने या निवडणूक यंत्रणेनेवरील तान कमी होईल असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. निवडणूक प्रक्रियेत प्रशासकीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडल्याने वैद्यकीय तक्रारी, आजारपण, औषधे, तपासण्या, कौटुंबिक अशी अनेक कारणे देते अधिकारीही निवडणुकीचे काम टाळण्याचा प्रयत्न करतात. वैद्यकीय प्रमाणपत्र दिले की, त्यांना नाहीही म्हणता येत नाही. त्यामुळे अनेकदा खासगी शाळांमधील शिक्षक व कर्मचारीही मतदान केंद्रांवर कर्मचारी म्हणून नियुक्त केले जातात असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Pune Crime : अल्पवयीन मुलांनी तोडफोड, जाळपोळ केल्यास पुणे पोलिस आरोपींच्या पालकांवरच गुन्हा दाखल करणार

पुण्यात महायुती विरोधात महावीकास आघाडी असा सामना रंगणार आहे. बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, भाजपने पुण्यासाठी माजी महापौर मुरलीधर मोहळ यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर महावीकास आघाडीने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. या ठिकाणी कॉँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर उत्सुक आहेत. तर मनसे मधून बाहेर पडलेले वसंत मोरे हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तर मोहन जोशी हे देखील उत्सुक आहेत.

शिरूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटकडून अमोल कोन्हे तर अजित पवार गटाकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. या ठिकाणी अढळराव पाटील हे घडयाळ या चिन्हावर लढण्याची शक्यता आहे. तर मावळ मतदार संघात अजित पवार कुणाला उमेदवारी देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

IPL_Entry_Point