मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते 'डिव्हाईन एजीटेटर्स, टिळक अँड हार्डी' पुस्तकाचे प्रकाशन

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते 'डिव्हाईन एजीटेटर्स, टिळक अँड हार्डी' पुस्तकाचे प्रकाशन

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 07, 2024 07:13 PM IST

Divine Agitators Tilak And Hardy Book : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उमाकांत तासगावकर लिखित 'डिव्हाईन एजीटेटर्स, टिळक ॲण्ड हार्डी' पुस्तकाचे मुंबईत नुकतेच प्रकाशन करण्यात आले.

डिव्हाईन एजीटेटर्स, टिळक ॲण्ड हार्डी' पुस्तक प्रकाशन सोहळा
डिव्हाईन एजीटेटर्स, टिळक ॲण्ड हार्डी' पुस्तक प्रकाशन सोहळा

उमाकांत तासगावकर लिखित 'डिव्हाईन एजीटेटर्स, टिळक ॲण्ड हार्डी' पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी लेखक तासगावकर, शीला तासगावकर, महाराष्ट्राचे  पोस्टमास्तर जनरल अमिताभ  सिंग, तसेच लंडनहून खास या समांरभासाठी आलेले दिलीप आमडेकर,  डॉ. माधवी आमडेकर आदी उपस्थित होते. पुस्तकावर सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे दोन निवृत्त  न्यायमूर्ती  राजन कोचर व राजेश केतकर यांनी आपले अभ्यासपूर्ण अभिप्राय नोंदवले आहेत.

गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी आणि सुखासाठी राबणारी लोकशाहीनिष्ठ राज्य व्यवस्था हा टिळक आणि हार्डी यांचा ध्यास होता आणि  भांडवलशाही आणि साम्राज्यवादाचे उच्चाटन त्यांना अभिप्रेत होते. टिळकांबद्दल केर हार्डी यांना किती आदर होता याचे पुरावे या पुस्तकात वाचायला मिळतात.

टिळकांनी लेबर पार्टीला १९१८ साली दोन हजार पौंडाची देणगी देऊन मजबूत बनण्यास मदत केली आणि १९४५ साली सत्तेवर आल्यावर लेबर पार्टीने भारताला स्वतंत्रता सन १९४७ साली मिळवून दिली. याचा खरा आणि रोमहर्षक इतिहास या पुस्तकात वाचायला मिळेल.

पुस्तकात ब्रिटीश राजवटीचा त्याच बरोबर, समकालीन अशा विविध घडामोडींचा आढावा घेतला आहे. सदर पुस्तकात लोकमान्य टिळक ह्यांचे भारतीय व ब्रिटिश  सहकारी व विरोधक ह्यांची सुमारे 18 खास काढून घेतलेली रंगीत व्यक्तीचित्रे समाविष्ट  केली आहेत.

WhatsApp channel