मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मोठी बातमी! २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर

मोठी बातमी! २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 19, 2024 05:35 PM IST

Public Holiday in Maharashtra : २२ जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे. या सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र सरकारने राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

ram lalla pran pratishtha
ram lalla pran pratishtha

अयोध्येतील राम मंदिराचे २२ जानेवारी रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. यादिवशी राम मंदिरात राम लल्लाची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे.हा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्रातही २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रापूर्वी अनेक राज्यात या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

२२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी देश-विदेशातील ६ हजाराहून अधिक व्हिआयपी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात राजकीय नेते, अभिनेते,उद्योगपती तसेच क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे. दरम्यान, प्रभू राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अनेक राज्यांमध्ये सुटी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने २२ जानेवारी रोजी केंद्रीय संस्था आणि इतर केंद्रीय औद्योगिक आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. त्या दिवशी दुपारी अडीच वाजता कार्यालयीन कामकाज सुरू होईल.

आता महाराष्ट्रातही सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली आहे. तसेच उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, आसाम व ओडिशा या राज्यांनी २२ जानेवारीला सुट्टी जाहीर केली आहे.

WhatsApp channel