Amravati Crime News : अमरावतीत भरवस्तीत सुरू असलेला गैरकारभार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. येथील राजकमल चौक ते राजापेठ रस्त्यावर एका इमारतीत असलेल्या स्पा-मसाज सेंटरमध्ये पोलिसांनी धाड टाकली. यावेळी येथे सुरू असलेल्या कारभारामुळे पोलिसांना देखील धक्का बसला. या ठिकाणी काही तरुणी आणि तरुण नको त्या अवस्थेत पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राजकमल चौक येथे एका इमारतीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार येथील स्थानिकांनी पोलिसांकडे केली होती. मसाज सेंटरच्या नावाखाली या ठिकाणी गैरप्रकार सुरू असल्याची स्थानिकांनी पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार राजकमल चौक ते राजापेठ रस्त्यावर एका मसाज पार्लरमध्ये गैरकरभार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सिटी कोतवाली पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. यावेळी काही तरुणी व तरुण अश्लील कृत्य करत असल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी मसाज सेंटर येथून ३ तरूण व ३ तरुणींना अटक केली आहे. या मुली वेश्या व्यवसाय करत असल्याचं उघड झालं आहे. दरम्यान, या पूर्वी देखील येथील नागरिकांनी स्थानिक नगर सेवकाला याची माहिती दिली होती. त्याने स्पा मालकाला हा धंदा बंद करण्यासाठी सांगितले होते. मात्र, तरीसुद्धा हा गैरप्रकार सुरूच होता. यामुळे पोलिसांना याची माहिती देण्यात आली. व ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या कारवाई दरम्यान, काही साहित्य देखील जप्त केले आहे. जेव्हा पोलिसांनी धाड टाकली तेव्हा काही तरुणी या अंडरगारमेंट्स बाथरुममध्ये गैरकृत्य करत होते.
चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीचा विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कोठडीत चक्कर आली होती. त्याला दवाखान्यात भरती केले असता, आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सचिन अशोक गायकवाड (वय ४७, रा. मुंढवा) असे मृत आरोपीचे नाव आहे. सचिनला पर्वती पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात सचिन गायकवाड व मनोहर रमेश माने (वय ३५) यांना अटक केली होती. ७ जुलै रोजी वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. दोन्ही आरोपींना विश्रामबाग-फरासखाना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. दरम्यान, या प्रकारचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.