मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Property Tax: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मालमत्ता कराबाबत शिंदें सरकारचा मोठा मोठा निर्णय

Mumbai Property Tax: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मालमत्ता कराबाबत शिंदें सरकारचा मोठा मोठा निर्णय

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 05, 2024 08:09 PM IST

Mumbai Property Tax : मालमत्ता करात कोणतीही वाढ न करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Mumbai Property Tax
Mumbai Property Tax

मुंबई महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांसाठी खुशखबर आहे. मालमत्ता करातून दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय घेत मालमत्ता करात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांची यंदाही वाढीव मालमत्ता करातून सुटका झाली आहे.  मालमत्ता करात कोणतीही वाढ न करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता धारकांवरील सुमारे ७३६ कोटी रुपयांचा कराचा वाढीव आर्थिक भार टळणार आहे.

या संदर्भात भांडवली मुल्याधारीत करप्रणालीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाची अंमलबजावणी करून अंतिम देयके मिळावीत याकरीता करदात्यांच्या व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागण्या प्राप्त झालेल्या होत्या. कर निर्धारण व त्यानुषंगाने मालमत्ता कराबाबतची सुधारित देयके कायद्यात सुधारणा केल्यानंतर द्यावी लागणार आहेत. त्यानुषंगाने मुंबई महानगरपालिका अधिनियम,१८८८ या कायद्यात प्रलंबित असलेली सुधारणा विचारात घेता,  २०२३-२४ मध्ये भांडवली मुल्य सुधारीत न करता  मुंबईतील करदात्यांना सवलत देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल.

WhatsApp channel