Priya singh case : प्रिया सिंह प्रकरणी अश्वजीत गायकवाडसह तिघांना अटक, लँड रोव्हर कारही जप्त
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Priya singh case : प्रिया सिंह प्रकरणी अश्वजीत गायकवाडसह तिघांना अटक, लँड रोव्हर कारही जप्त

Priya singh case : प्रिया सिंह प्रकरणी अश्वजीत गायकवाडसह तिघांना अटक, लँड रोव्हर कारही जप्त

Dec 18, 2023 12:14 AM IST

Social Media Influencer Priya Singh Case : लिव इन प्रेयसीला कारखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीसह त्याच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे.

Priya singh case
Priya singh case

सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर ( Social Media Influencer) प्रिया सिंह (Priya Singh Case) प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. तिच्यावर जीवघेणा हल्ला करत कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी अश्वजीत गायकवाड  याच्यासह अन्य तीन आरोपींना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. कासारवडवली पोलिसांनी ही कारवाई केली असून गुन्ह्यात  वापरलेली लँड रोव्हर कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अश्वजित गायकवाड, रोमिल पाटील आणि सागर शेंडगे  यांचा समावेश आहे.

अश्वजित गायकवाड हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) व्यवस्थापकीय संचालकाचा मुलहा आहे. त्याच्यावर इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर असलेली गर्लफ्रेंड प्रिया सिंह हिला  कारने चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. प्रिया व अश्वजीत गेल्या साडे चार वर्षापासून लिव इन रिलेशनशीपमध्ये राहतात. अश्वजित हा भाजप युवा मोर्चाचा अध्यक्षही आहे. यामुळे याप्रकरणात राजकीय लागेबांधे असल्याने आरोपींवर कारवाई करण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप पीडितेने केला होता. 

प्रिया सिंह हिने अश्वजीत गायकवाड याने मित्रांच्या मदतीने कारखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सोशल मीडियावर पोस्ट करून केला होता. त्यानंतर या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पीडितेची भेट घेऊन हा मुद्दा अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगतिले. राज्य महिला आयोगानेदेखील पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. 

यानंतर आज ठाणे पोलिसांनी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली.  त्याचबरोबर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली  स्कार्पिओ आणि लँड रोव्हर डिफेंडर कार जप्त केली आहे. 

प्रिया सिंह हिने दिलेल्या माहितीनुसार अश्वजीत आणि ती गेल्या साडेचार वर्षांपासून एकत्र राहतात. मात्र अश्वजीत विवाहित असल्याचे त्याने तिच्यापासून लपवले होते. काही दिवसानंतर तिला समजल्यावर त्याने सांगितले की, दोघांचे पटत नसून लवकरच ते घटस्फोट घेणार आहेत. त्यानंतर प्रियाने अश्वजीतला अनेकदा फोन केला मात्र त्याने तिला टाळायला सुरूवात केली. काही दिवसापूर्वी त्याने तिला घोडबंदर रोडवरील ओवळा भागातल्या कोर्टयार्ड हॉटेलजवळ बोलावले. तेथे दोघांच्यात वाद झाल्यानंतर अश्वजीतनं त्याचा चालक सागरला प्रियाच्या अंगावर गाडी घालायला लावली. सागरनेही तिला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. प्रियाला जखमी अवस्थेत सोडून आरोपी तिथून पळून गेले. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर