मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Employee Strike Nagpur : ‘संपात सहभागी झालात तर नोकरी गेली समजा’, प्राचार्यांकडून शिक्षकांना धमक्या
Employee Strike For Old Pension Scheme In Maharashtra
Employee Strike For Old Pension Scheme In Maharashtra (HT)

Employee Strike Nagpur : ‘संपात सहभागी झालात तर नोकरी गेली समजा’, प्राचार्यांकडून शिक्षकांना धमक्या

14 March 2023, 15:00 ISTAtik Sikandar Shaikh

Employee Strike News : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यामुळं त्याचा सामान्यांना मोठा फटका बसत आहे.

Employee Strike For Old Pension Scheme In Maharashtra : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यातील प्रमुख शहरांमधील कर्मचारी मोठ्या संख्येनं संपावर गेले असून त्यामुळं प्रशासकीय यंत्रणा खोळंबली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांसह शिक्षकांनीही संपात सक्रियपणे सहभाग घेतला आहे. परंतु आता संपात सहभागी होणाऱ्या शिक्षकांना नोकरीवरून काढण्याची धमकी दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरातून समोर आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनीही सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता संपात सामील होणाऱ्या शिक्षकांना नोकरीवरून काढण्याची धमकी महाविद्यालयातील प्राचार्यांकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय नागपुरातील शासकीय कार्यालयातील कर्मचारी संपात सामील होणार असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. त्यामुळं आता या प्रकरणावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील १८ लाख कर्मचारी संपावर गेल्याचा दावा कर्मचारी संघटनांकडून करण्यात आला आहे. त्यात शिक्षकांचा मोठा समावेश असल्याचं बोललं जात आहे. नागपुरातील अनेक शाळांमध्ये आंदोलनकर्त्या शिक्षकांनी शिक्षकांनी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीचं निवेदन मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना दिलं आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापुर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापुरात कर्मचारी मोठ्या संख्येनं संपावर गेलेले आहेत. त्यामुळं आज शासकीय कार्यालयांमध्ये चांगलाच शुकशुकाट पाहायला मिळाला.