मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात दोनदा येणार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, कारण काय ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात दोनदा येणार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, कारण काय ?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 30, 2024 09:00 PM IST

PM Modi maharashtra Visit : जानेवारी महिन्यात नाशिक, नवी मुंबई व सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात यवतमाळ व पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

PM Modi
PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी दीड महिन्यात तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. ११ फेब्रुवारी रोजी मोदी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत तर १९ फेब्रुवारी रोजी पुण्यात येत आहेत. पंतप्रधान मोदींच्या संभावित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाल जिल्हा प्रशासनाची बैठक पार पडली.

यवतमाळमध्ये मोदींची एक सभाही होणार आहे. मात्र अजूनपर्यंत स्थळ निश्चित झाले नाही. पंतप्रधान मोदी ११ फेब्रुवारी रोजी यवतमाळमध्ये महिला स्वयं सहायता समूहाच्या कार्यक्रमात सामील होतील. त्याचबरोबर जिल्ह्यातील विकास प्रकल्पाचे उदघाटन करतील. 

१९ फेब्रुवारी रोजी मोदी पुण्यात येण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात मोदी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होणार आहेत. पुणे एअरपोर्ट टर्मिनल व मेट्रोच्या नवीन मार्गिकेचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.

पंतप्रधान मोदी जानेवारी महिन्यात नाशिक, नवी मुंबई व सोलापूर दौऱ्यावर आले होते. मुंबईत अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक इथं आयोजित २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवालाही हजर राहिले होते. त्यानंतर सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते.

सोलापूरात पंतप्रधानांच्या हस्ते १५ हजार घरकुलांचं लोकार्पण करण्यात आलं होतं. त्यानंतर आता ११ व १९ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंती असल्याने पंतप्रधान मोदी शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहे. 

WhatsApp channel