मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PM Modi : भाजपचे मिशन मुंबई ! मोदींचा दूसरा मुंबई दौरा ठरला, १० फेब्रुवारी रोजी पुन्हा येणार शहरात

PM Modi : भाजपचे मिशन मुंबई ! मोदींचा दूसरा मुंबई दौरा ठरला, १० फेब्रुवारी रोजी पुन्हा येणार शहरात

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 29, 2023 09:28 AM IST

PM Modi : मुंबई महानगर पालिकेवर आपली सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने कंबर कसली आहे. या साठी थेट पंतप्रधान नरेंद मोदी यांना मैदानात उतरवले आहे. लवकरच त्यांचा दूसरा मुंबई दौरा होण्याची शक्यता आहे.

PM Narendra Modi Mumbai Visi
PM Narendra Modi Mumbai Visi (ANI)

मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहे. या साठी सर्व पक्ष तयारीला लागले आहे. भाजपने देखील मिशन मुंबईचा प्लॅन आखला आहे. या अंतर्गत मुंबई महानगर पालिकेवर निर्विवाद सत्ता मिळवण्यासाठी भाजप शिंदे गट प्रयत्नशील राहणार आहे. याचाच एक भाग म्हणून नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातून निवडणूकीचे रणशिंग भाजपने फुंकले. मिशन मुंबईसाठी आता पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होण्याची शक्यता असून त्याची तारीख देखील ठरली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई महापालिकेच्या विकासकामांच्या लोकार्पणानंतर आता येत्या १० फेब्रुवारीला बोहरा समाजाच्या कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती मिळत आहे. बोहरी समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन या कार्यक्रमाची माहिती त्यांना दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्याने मोदी यांचे मुंबई दौरे वाढले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्या असून कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्याच आठवड्यात मुंबई महापालिकेच्या विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी मोदी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करताना भाजपच्या हातात मुंबई महापालिकेची सत्ता देण्याचे आवाहन मोदी यांनी केले होते. त्यानंतर आता पुन्हा मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत.

 

WhatsApp channel