मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Price Hike : वडापावच्या किंमतीत चार रुपयांनी होणार वाढ; ऐन हिवाळ्यात सामान्यांना महागाईचा झळा

Price Hike : वडापावच्या किंमतीत चार रुपयांनी होणार वाढ; ऐन हिवाळ्यात सामान्यांना महागाईचा झळा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 02, 2022 12:53 PM IST

Vada Pav Price Hike : पावासह ब्रेडच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं त्याचा परिणाम वडापावच्या किंमतीवरही होणार आहे.

Vada Pav Price Hike In Maharashtra
Vada Pav Price Hike In Maharashtra (HT)

Vada Pav Price Hike In Maharashtra : केवळ दहा ते पंधरा रुपयांना मिळणारा वडापाव हे सर्वसामान्यांना परवडणारं आणि आवडतं खाद्य आहे. मुंबईच्या धावत्या लाईफमध्ये काही मिनिटांत पोटभर जेवण केल्याची फिल देणारा वडापाव आता महागण्याची शक्यता आहे. कारण आता राज्यात पाव आणि ब्रेडच्या दरांमध्ये वाढ झाल्यानं वडापावच्याही किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांमध्ये १० ते १५ रुपयांच्या आत वडापावची विक्री केली जाते. परंतु आता वडापावच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पावाच्या दरात ५० पैशांची वाढ झाली आहे. २०२२ या वर्षातली ही तिसरी दरवाढ आहे. पावासोबत ब्रेडच्याही किंमती वाढल्यानं वडापावच्या किंमती वाढणार असल्याचं बोललं जात आहे. वडापावसोबत समोसा, कचोरी आणि भजींचीही किंमत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं आता आधी पेट्रोल, डिझेल, टोमॅटो आणि गॅसच्या वाढलेल्या किंमतीमुळं होरपळून निघत असलेल्या सामान्याना वडापाव खाण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

वडापाव किती रुपयांनी महागणार?

समोर आलेल्या माहितीनुसार, तीन ते चार रुपयांनी वडापावच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं १० ते १५ रुपयांना मिळणाऱ्या वडापावची किंमत २० रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. ऐन हिवाळ्यात सर्वसामान्य लोकांना या महागाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

मुंबईत वडापाव खाणाऱ्यांची संख्या अधिक...

मुंबई शहरात प्रत्येक व्यक्ती काम किंवा नोकरीसाठी धावपळ करत असतो. त्यामुळं घरून डबा न आणता फक्त वडापाव खाल्ल्यानं काही मिनिटांत पोट भरल्यासारखं वाटतं. शिवाय वडापाव स्वस्त मिळत असल्यानं अनेक लोक या पदार्थ खाण्याला पसंती देत असतात. विशेष म्हणजे मुंबईच्या धावत्या लाईफला वडापाव सूट करतो. त्यामुळं आता वडापावची किंमत वाढली तर मुंबईकरांनाही मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point