मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar: देशात सध्या फक्त गाय, गोमूत्र आणि गोळवलकर दिसतात; शरद पवारांची जहरी टीका

Sharad Pawar: देशात सध्या फक्त गाय, गोमूत्र आणि गोळवलकर दिसतात; शरद पवारांची जहरी टीका

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 04, 2024 07:47 PM IST

Sharad Pawar Slams Modi Government: आगामी लोकसभा निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.

Sharad Pawar
Sharad Pawar

Sharad Pawar Ahmednagar Visit: राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार अहमदनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपने जनतेला अनेक आश्वासने दिली. मात्र, त्यापैकी एकाचाही अंमलबजावणी केली नाही. भाजपने जनतेची फसवणूक केल्याची शरद पवारांनी म्हटले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील राजकीय परिस्थिती भाजपसाठी अनुकूल नसल्याचे त्यांनी म्हटले. यासोबतच त्यांनी ४०० हून अधिक जागा जिंकणार असल्याचा भाजपचा दावाही फेटाळून लावला.

पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, "देशातील परिस्थिती भाजपसाठी अनुकूल नाही. लोकसभा निवडणुकीत ५४३ पैकी ४०० हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला. परंतु, देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये भाजप सत्तेत नाही. भाजपने २०१४ च्या निवडणुकीपूर्वी जनतेला अनेक अश्वासन दिली. परंतु, सत्तेत आल्यानंतर भाजपने त्यापैकी एकाचीही अंमलबजावणी केली नाही. भाजपने जनतेची फसवणूक केली."

Maharashtra Cabinet : सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार, शिंदे सरकारचे १० महत्त्वाचे निर्णय

“बारामतीला धनगर समाजाच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आल्यानंतर आरक्षण देण्याचे म्हटले होते. परंतु आज ९ वर्षे झाले, तरी त्यांनी काहीही निर्णय घेतलेला नाही. त्यांना आरक्षणाची गरज आहे. त्यांनाही पुढे जाण्याची संधी दिली गेली पाहिजे. सध्याच्या सरकारची भूमिका समाजातील लहान घटकांना मदत न करण्याची आहे. त्यामुळे सध्या देशात फक्त गाय, गोमूत्र आणि गोळवलकर एवढंच दिसत आहे. खरे तर आरएसएसची विचारधारा रुजवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत”, असे शरद पवार साहेब म्हणाले.

पुढे शरद पवार म्हणाले की, "मोदी संसदेत क्वचितच येतात. पण ज्यावेळी येतात, तेव्हा एखाद्या धोरणाची अशी मांडणी करतात की, संसदेतले सदस्य थक्क होतात. दरम्यान, २०१६-१७ अर्थसंकल्पात मोदींनी २०२२ पर्यंत देशातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं जाईल, अशी घोषणा केली होती. तसेच शहरी भागातील लोकांना पक्की घरे दिली जाईल, असेही म्हटले होते. परंतु, आता २०२४ आले. पण काहीच घडले नाही. मोदी सांगतात गॅरंटी आहे. पण ती काही खरी नाही, त्याचा अनुभव अनेकदा आला आहे."

 

WhatsApp channel