pune potholes : पुण्यातील खड्ड्यांवर थेट राष्ट्रपतींनी केली नाराजी व्यक्त! पुणे पोलिसांना पत्र लिहीत म्हटलं....-president draupadi murmu unhappy with pune potholes writes letter to police ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  pune potholes : पुण्यातील खड्ड्यांवर थेट राष्ट्रपतींनी केली नाराजी व्यक्त! पुणे पोलिसांना पत्र लिहीत म्हटलं....

pune potholes : पुण्यातील खड्ड्यांवर थेट राष्ट्रपतींनी केली नाराजी व्यक्त! पुणे पोलिसांना पत्र लिहीत म्हटलं....

Sep 22, 2024 09:42 AM IST

pune potholes : पुण्यातील खड्ड्यांची दखल थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतली आहे. त्यांनी थेट पुणे पोलिसांना पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुण्यात पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी रस्ते दुरुस्ती करावी असे पत्र पोलिसांनी पालिकेला दिले आहे.

पुण्यातील खड्ड्यांवर थेट राष्ट्रपतींनी केली नाराजी व्यक्त! पुणे पोलिसांना पत्र लिहीत म्हटलं....
पुण्यातील खड्ड्यांवर थेट राष्ट्रपतींनी केली नाराजी व्यक्त! पुणे पोलिसांना पत्र लिहीत म्हटलं....

pune potholes : पुण्यात ट्रक एका मोठ्या खड्ड्यात पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेमुळे पुण्यातील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. असे असताना पुण्यातील खड्ड्यांमुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही नाराज असल्याचं पुढं आलं आहे. राष्ट्रपती या पुण्यात २ आणि ३ सप्टेंबरला पुण्यात आल्या होत्या. राष्ट्रपती पुण्यात येणार असल्याने पुणे महानगर पालिकेने रस्त्यांची डागडुजी केली मात्र, ती चुकीच्या पद्धतीने केली. त्यामुळे या खड्ड्यांबाबत राष्ट्रपती कार्यालयाने पुणे पोलिसांना पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, २६ तारखेला पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार असून त्या पूर्वी रस्ते दुरुस्त करावे असे पत्र पुणे पोलिसांनी पालिकेला लिहिले आहे.

पुण्यात रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. पुण्यातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यात पुण्यात मेट्रोची कामे असल्यामुळे त्यात आणखी भर पडली आहे. याचा त्रास पुण्यातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. राष्ट्रपती या २ आणि ३ तारखेला पुण्यात आल्या होत्या. यावेळी चुकीच्या पद्धतीने पुण्यातील खड्डे घाई घाईत बुजले. मात्र, राष्ट्रपतीच्या ताफ्याला याचा फटका बसला. पुण्यातील राजभवनात राष्ट्रपति थांबल्या होत्या. येथून त्या पुण्यातील विविध भागात गेल्या. दरम्यान, राष्ट्रपतींच्या ताफ्यातील वाहनांना पुण्यातील खड्ड्यांचा त्रास झाला. त्यामुळे राष्ट्रपती कार्यालयाने थेट पुणे पोलिसांना पत्र लिहीत पुण्यातील खड्ड्यांबाबत नाराजी व्यक्त केली.

पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी पुणे पोलिसांचे राष्ट्रपतींना पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २६ सप्टेंबरला पुण्यात येणार आहेत. शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रोचे भूमिपूजन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे.  शिक्षक प्रसारक मंडळी संस्थेचे स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर सहभागी होतील. त्यानंतर ते पुणे मुक्कामी राहणार आहेत. त्यासाठीची सर्व व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या सोबतच  दुसऱ्या दिवशी  विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील विकसित भारत या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.  त्यामुळे त्यांच्या दौऱ्याआधी पुण्यातील खड्डे बुजवण्यात यावे यासाठी पुणे पोलिसांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. व पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या सूचना पुणे पोलिसांनी महापालिकेला केली आहे.

Whats_app_banner
विभाग