Kumbh News : कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी! १५ हून अधिक लोक दगावल्याची भीती; शाही स्नान रद्द
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Kumbh News : कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी! १५ हून अधिक लोक दगावल्याची भीती; शाही स्नान रद्द

Kumbh News : कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी! १५ हून अधिक लोक दगावल्याची भीती; शाही स्नान रद्द

Jan 29, 2025 06:31 AM IST

Prayagraj Mahakumbh Stampede : प्रयागराज येथील कुंभमेळ्यादरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेनंतर आखाड्यांचे शाही स्नान रद्द करण्यात आले आहे. मौनी अमावास्येला सर्व आखाड्यांचे नागा साधू संतांसोबत शाही स्नान करतात.

कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी! काहींच्या मृत्यूची शक्यता; आखाडा परिषदेचा शाही स्नान रद्द करण्याचा निर्णय
कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी! काहींच्या मृत्यूची शक्यता; आखाडा परिषदेचा शाही स्नान रद्द करण्याचा निर्णय

Prayagraj Mahakumbh Stampede : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्या दरम्यान, पहाटे १ वाजता चेंगराचेंगरीची घटना घडली. घाटावर अचानक मोठी गर्दी झाल्याने ही चेंगराचेंगरी झाली, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. यात १५ नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाने याला दुजोरा दिलेला नाही. अपघातात जखमी झालेल्या अनेकांना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेण्यात आले आहे. घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात असून आखाडा परिषदेने अमृत स्नान पुढे ढकलले आहे.

आखाड्यांचे शाही स्नान रद्द

महाकुंभातील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आखाड्यांचे शाही स्नान रद्द करण्यात आले आहे. प्रशासनाने केलेल्या आवाहनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मौनी अमावास्येला सर्व आखाड्यातील साधू-संत शाही स्नान करत असतात. यावेळी भाविकांच्या सोयीसाठी आखाड्यांना पहाटे ४ वाजल्यापासून शाही स्नानासाठी निघावे लागले आणि ५ वाजेच्या आधीच स्नान सुरू करावे लागले. आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी सांगितले की, लोकांची गर्दी लक्षात घेता स्नान रद्द करण्यात आले आहे.

रवींद्र पुरी यांनी सांगितले की, आज झालेली चेंगराचेंगरी लक्षात घेता आज शाही स्नान न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण मेळा परिसरात लाखो भाविक आले आहेत. या पार्श्वभूमीवर आजचे स्नान रद्द करण्यात यावे, असे आवाहन सर्वांना करण्यात आले आहे. आता आपण पुढच्या वसंत पंचमीला शाही स्नान करू. रवींद्र पुरी म्हणाले की, काल सायंकाळपर्यंत आम्ही या शाही स्नानाची योग्य व्यवस्था केली होती. मात्र, तरीसुद्धा मोठी गर्दी झाली, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. ज्याप्रमाणे प्रयागराजमध्ये गंगा, यमुना, सरस्वती यांचा संगम आहे, त्याचप्रमाणे या वेळी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण यांचा संगम येथे होतो. सध्या संपूर्ण भारतातील नागरिक प्रयागराजमध्ये आले आहेत.

 

प्रयागराज महाकुंभातील मौनी अमावस्येनिमित्त संगम नाक्यावर चेंगराचेंगरी झाली. या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
प्रयागराज महाकुंभातील मौनी अमावस्येनिमित्त संगम नाक्यावर चेंगराचेंगरी झाली. या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

रवींद्र पुरी म्हणाले की, हे अनपेक्षित होते. अनुचित घटना कोण टाळू शकेल? त्यामुळे आम्ही आज शाही स्थान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जर या घटनेत कुणी दुर्दैवाने मृत्युमुखी पडले असल्यास त्यांना शांती लाभो. अशी प्रार्थना गंगा मातेच्या चरणी करतो. तत्पूर्वी महानिर्वाणी व अटल आखाडा पहाटे पाच वाजता संगम नोज येथे स्नान करणार होते. दोन्ही आखाड्याची मिरवणूक पिपा पूल ओलांडून रामघाटावरून परतली होती.

कशी घडली घटना ? प्रत्यक्दर्शीनी सांगितलं

प्रयागराज महाकुंभात मौनी अमावस्येनिमित्त संगम नोज येथे चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जखमींना महाकुंभातील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत किती जण जखमी झाले हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, मध्यवर्ती रुग्णालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पहाटे साडेतीन वाजल्यापासून २२ रुग्णवाहिका मध्यवर्ती रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. आखाड्याला पाच वाजल्यापासून संगम नाका येथे स्नान करायचे होते, मात्र अद्याप त्यांना आखाडा मार्गात प्रवेश करता आलेला नाही. आखाडा मार्गावर दर १०-५ मिनिटांनी रुग्णवाहिकेच्या सायरनचे आवाज ऐकू येत होते.

प्रत्यक्षदर्शींनी व कर्नाटकातील बेळगाव येथील असलेल्या सरोजिनी या महिलेने सांगितले की, संगम नाकावर अचानक गर्दी झाली आणि खांब कोसळला आणि चेंगराचेंगरी झाली. या घटनेत काही वृद्ध व्यक्ती व नागरिक जखमी झाले.

गोंडायेथील दर्जी कुआं येथील रहिवासी जोखू लाल यांनी सांगितले की, चेंगराचेंगरीत त्यांचे काका नानकन (वय ४४) यांचा मृत्यू झाला. मृतदेह घेण्यासाठी ते मध्यवर्ती रुग्णालयात आले आहेत. बलियातील नागरा येथील रहिवासी बलजीत सिंग यांनी सांगितले की, अचानक मोठी गर्दी वाढली व चेंगराचंगरे झाली. यात त्यांच्यासोबत आलेले लोक जखमी झाले.

बिहारमधील सासाराम बिहार साजन डेरा येथील रहिवासी श्याम नारायण हे त्यांची पत्नी व घरातील ७ जणांसोबत आले होते. त्यांचा दीड वर्षाचा नातू चेंगराचेंगरीत खाली पडल्याने तो जखमी झाला आहे. त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर