मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pratap Sarnaik: प्रताप सरनाईक एकदम ओके! EDच्या कचाट्यातून सुटणार; कोर्टाने स्वीकारला क्लोजर रिपोर्ट

Pratap Sarnaik: प्रताप सरनाईक एकदम ओके! EDच्या कचाट्यातून सुटणार; कोर्टाने स्वीकारला क्लोजर रिपोर्ट

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 16, 2022 01:52 PM IST

Pratap Sarnaik: शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा मिळण्याची शक्यता असून त्यांची ईडीच्या कचाट्यातून सुटका होऊ शकते.

आमदार प्रताप सरनाईक
आमदार प्रताप सरनाईक (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Pratap Sarnaik: शिवसेनेत बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या आमदार प्रताप सरनाईक यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. ईडीच्या कचाट्यात सापडलेल्या प्रताप सरनाईक यांची आता सुटका होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय असणाऱ्या चांदोले आणि शशिधरन यांच्या दोषमुक्तीसंदर्भातील अर्ज स्वीकारला आहे. न्यायालयाने बुधवारी टॉप्सग्रुप विरोधातील प्रकरणात क्लोजर आर्थिक गुन्हे शाखेने सादर केलेला क्लोजर अहवाल स्वीकारला आहे.

ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता, तसंच याप्रकरणी आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशीही केली होती. आता आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला क्लोजर अहवाल न्यायालयाने स्वीकारल्याने प्रताप सरनाईक यांना दिलासा मिळू शकतो. न्यायालयाने ईडीला आता या प्रकरणी २१ सप्टेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं आहे.

गुरुवारी या प्रकरणातील आरोपींनी पीएमएलए विशेष न्यायालयाकडे अर्ज केला. गुन्हा बंद झाला असल्यानं ईडी या प्रकरणात पुढे कार्यवाही करू शकत नाही. तसंच ईडीच्या प्रकरणातील आरोपातून मुक्तता करण्यात यावी यासाठीही आरोपींनी अर्ज दाखल केला. आर्थिक गुन्हे शाखेकडून जानेवारी महिन्यात सी समरी क्लोजर रिपोर्ट न्यायलयात सादर करण्यता आला होता. तसंच यात कोणताही गुन्हा केला नसल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने बुधवारी क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे.

टॉप्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक मारत शिशिधरन यांचे वकील कुशल मोर यांनी न्यायालयीयन कोठडीत वाढ न करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. आरोपींवर दाखल केलेला गुन्हा बंद झाल्यानं पुढील कार्यवाही थांबवावी असं त्यांनी म्हटलं. तसंच ईडीला क्लोजर रिपोर्टच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, त्यामुळे याविरोधात ईडीने अपील करण्याचा प्रश्न नाही असंही न्यायलयात सांगण्यात आले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या