हडपसर मतदारसंघात पुन्हा मतमोजणी करा! प्रशांत जगतापांनी अर्ज करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरले तब्बल १२ लाख ७४ हजार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  हडपसर मतदारसंघात पुन्हा मतमोजणी करा! प्रशांत जगतापांनी अर्ज करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरले तब्बल १२ लाख ७४ हजार

हडपसर मतदारसंघात पुन्हा मतमोजणी करा! प्रशांत जगतापांनी अर्ज करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरले तब्बल १२ लाख ७४ हजार

Nov 30, 2024 07:02 AM IST

Hadapsar Assembly Constituency : राज्यात हडपसर मतदार संघात पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी प्रशांत जगताप यांनी केली आहे. या साठी त्यांनी मोठी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली आहे.

हडपसर मतदारसंघात पुन्हा मतमोजणी करा! प्रशांत जगतापांनी अर्ज करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरले तब्बल १२ लाख ७४ हजार
हडपसर मतदारसंघात पुन्हा मतमोजणी करा! प्रशांत जगतापांनी अर्ज करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरले तब्बल १२ लाख ७४ हजार

Hadapsar Assembly Constituency : राज्यात विधानसभा निवडणूचे निकाल धक्कादायक लागले. महायुतीतने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. हा पराभव महाविकास आघाडीच्या नेत्यांना वर्मी लागला आहे. निवडणूक निकालावर अनेकांनी शंका व्यक्त केली असून पेरमतमोजणीची मागणी वाढली आहे. पुण्यातील हडपसर मतदार संघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्रशांत जगताप यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत फेरमतमोजणीची मागणी केली आहे. यासाठी तब्बल १२ लाख ७४ हजार रुपये त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भरले आहेत.

विधानसभा निवडणुकीत येत्या काही दिवसांनत महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. सध्या मुख्यमंत्री व मंत्रिमंडळावरून चर्चा सुरू आहे. मात्र, या दरम्यान, पराभूत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रशानंत जगताप यांनी ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी जगताप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल १२ लाख ७४ हजार रुपयांचे शुल्क भरले आहे.

हडपसर मतदार संघात पुन्हा मतमोजणी करा : जगताप

पुन्हा मतमोजणीची मागणी करत जगताप म्हणाले, महाराष्ट्र राज्य विधानसभेचे निकाल लागल्यानंतर केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात ईव्हीएम बद्दल संशय व्यक्त केला जात आहे. देश विदेशातील जाणकार याबाबत आपले मत मांडत असून ईव्हीएममध्ये गैरप्रकार झाल्याची अनेकांची भावना आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनीही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत याबाबत काही पुरावे ही सादर केले. हडपसर मतदार संघात पुन्हा मतमोजणी व्हावी यासाठी त्यांनी अर्ज केला असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १२ लाख ७४ हजार रुपये शुल्कही त्यांनी चलनाच्या माध्यमातून जमा केले आहे. "कोण आमदार होणार, कोणाची सत्ता येणार एवढ्या पुरताच हा प्रश्न मर्यादित नाही. जनतेच्या मतांची झालेली चोरी थांबवणे, लोकशाहीचे सुरू असलेले वस्त्रहरण रोखणे, या प्रकरणात दोषी असलेल्या देशद्रोही लोकांवर कडक कारवाई करणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याची भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधानावर श्रद्धा असलेला प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून लोकशाहीच्या रक्षणासाठी हा लढा न्यायालयीन पातळीसह रस्त्यावरही सुरूच असेल. आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून या लढ्यातून नक्कीच न्याय मिळेल हा विश्वासही प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला. 

 

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर