मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vanchit Bahujan Aghadi : ‘दोन दिवसांत जागावाटपाचा निर्णय घ्या, नाहीतर…'; वंचितचे महाविकास आघाडीला रोखठोक पत्र

Vanchit Bahujan Aghadi : ‘दोन दिवसांत जागावाटपाचा निर्णय घ्या, नाहीतर…'; वंचितचे महाविकास आघाडीला रोखठोक पत्र

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 24, 2024 07:42 PM IST

Vanchit Bahujan Aghadi : दोन दिवसांत जागा वाटपाचा निर्णय जाहीर करावा, अन्यथा आम्हाला निर्णय घेणं सोपं जाईल,असं रोखठोकपत्र वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीतील नेत्यांना लिहिले आहे.

anchit Bahujan aghadi wrote letter to mva leader
anchit Bahujan aghadi wrote letter to mva leader

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र अजूनही वंचितचे तळ्यात-मळ्यात असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांत जागा वाटपाचा निर्णय जाहीर करावा, अन्यथा आम्हाला निर्णय घेणं सोपं जाईल,असं रोखठोक पत्र प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीतील नेत्यांना लिहिले आहे.

काँग्रेस,राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी त्यांच्यात ठरलेल्या जागा वाटपाची माहिती दोन दिवसांत जाहीर करावी, अशी मागणी या पत्रातून केली आहे.

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची २२ फेब्रुवारीला पत्रकार परिषद झाली. यात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये ३९ जागांवर एकमत झाले असून, लवकरच २७ किंवा २८ फेब्रुवारीला औपचारिक आणि अंतिम निर्णय घेतला जाईल,असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले होते. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करण्याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चेन्नीथला म्हणाले होते की, काँग्रेसने किमान समान कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रस्तावित ३९ कलमी अजेंडा स्वीकारला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीकडून जागांची मागणी अद्याप आलेली नाही.

'किमान समान कार्यक्रमासाठी आमच्या प्रस्तावित ३९-पॉइंट अजेंडावर काँग्रेसने स्वीकारल्याचे आम्ही स्वागत करतो. आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांना किमान समान कार्यक्रमासाठी त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप-आरएसएसचा आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी मविआतील तिन्ही पक्षांच्या मसुद्यासह एक किमान समान कार्यक्रम तयार करणे महत्वाचे आहे.

मविआने वंचित बहुजन आघाडीला आत्तापर्यंत अंतिम झालेल्या जागा वाटपासंदर्भात माहिती द्यावी. २ फेब्रुवारीला मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये तीन पक्षांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या आमच्या शेवटच्या बैठकीतही आम्ही हीच विनंती केली होती.

महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दोन दिवसांच्या आत त्यांच्या जागासंदर्भात माहिती द्यावी, म्हणजे आम्हाला निर्णय घेणे सोपे जाईल. ही डेडलाइन नाही पण आमच्या सोयीसाठी हे आवश्यक आहे. जेणेकरुन आम्हाला कोणाशी बसायचे आहे, चर्चा करायची आहे हे समजू शकेल, असे या पत्रात म्हटले आहे.

IPL_Entry_Point