Maharashtra Assembly Elections 2024 : प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. याआधी वंचितने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत केवळ १० मुस्लिम उमेदवारांना संधी दिली होती. विशेष म्हणजे या यादीत प्रकाश आंबेडकरांनी वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्याविरोधातही उमेदवाराची घोषणा केली आहे.
लोकसभा निवडणुकीपासूनच विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या वंचितने विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच वंचितकडून उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिल्या यादीत ११ उमेदवारांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत १० उमेदवारांची नावे होती. आता तिसऱ्या यादीत ३० उमेदवारांना संधी देण्यात आली आहेत. त्यामुळे वंचितकडून आतापर्यंत ५१ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वंचितने आपल्या यादीत उमेदवारांच्या नावासह त्यांच्या जातीचा देखील उल्लेख केला आहे.
वंचितने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीतआदित्य ठाकरे यांच्यासह अनेक माजी मंत्र्यांविरोधात उमेदवार दिले आहेत.वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात अमोल निकाळजे यांना उमेदवारी दिली आहे. अमित देशमुख यांच्या लातूर शहर मतदारसंघातून विनोद खटके यांना उमेदवारी दिली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात अब्दुल व्होरा, राजेश टोपे यांच्या घनसावंगी मतदारसंघात कावेरी खटके यांना उमेदवारी दिली आहे.त्याचबरोबर माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अणुशक्तीनगर मतदारसंघातून सतीश राजगुरू यांना संधी दिली आहे.
संबंधित बातम्या