मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भाजपने एकनाथ शिंदेंसमोर ठेवलेली अट खरी आहे का? प्रकाश आंबेडकरांचे सूचक ट्वीट
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)
23 June 2022, 9:38 ISTSuraj Sadashiv Yadav
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
23 June 2022, 9:38 IST
  • शिवसेनेत बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासमोर भाजपने प्रस्ताव ठेवताना एक अट घातली असल्याचं सूचक ट्वीट प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड पुकारल्यानंतर आता एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) गट भाजपसोबत सरकार स्थापनेसाठी हालचाल करत असल्याचं सांगण्यात येत आहे. यासंदर्भात भाजपकडून (BJP) प्रस्ताव दिला असल्याचंच म्हटलं जात आहे. दरम्यान, यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ट्विटरवरून मोठा प्रश्न विचारला आहे. शिवसेनेच्या विलिनीकरणाची अट भाजपने एकनाथ शिंदेंसमोर ठेवलीय का? तरच सरकार बनेल का असे प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

प्रकाश आंबेडक यांनी केलेल्या ट्विटनंतर आता वेगळीच चर्चा रंगली आहे. प्रकाश आंबेडक यांनी म्हटलं की, “भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासमोर भाजपमध्ये शिवसेना विलीन केल्यास सरकार स्थापन होईल अशी अट ठेवलीय हे खरं आहे का?”

प्रकाश आंबेडकरांच्या ट्विटरवर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलं की, "प्रकाश आंबेडकर जे काही बोलतात ते त्यांच्या चित्र विचित्र विधानांचा भाग आहे. त्याला आम्ही फारसं महत्त्व देत नाही. शिवसेनेचं जे काही चाललंय त्याचा भाजपशी काही संबंध नाही. कोणाकडे किती आमदार, कुणाची ताकद किती हा शिवसेनेचा प्रश्न आहे."

शिवसेनेचे अंतर्गत प्रश्न असल्यानं भाजपची भूमिका स्पष्ट आहे. विधानसभेच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका सांगितली होती. आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर आणि विधीमंडळात संघर्ष करू. अंतर्विरोधाने भरलेलं हे सरकार आहे. तिन्ही पक्षांची भांडणं असतात आणि हे गेल्या निवडणुकांमध्ये स्पष्ट झालं आहे. यावर भाजपने बोलण्यात काही अर्थ नाही असंही भातखळकर यांनी म्हटल.