महायुतीचा वाद चव्हाट्यावर! रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, आदिती तटकरे, गिरीश महाजनांना धक्का
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महायुतीचा वाद चव्हाट्यावर! रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, आदिती तटकरे, गिरीश महाजनांना धक्का

महायुतीचा वाद चव्हाट्यावर! रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, आदिती तटकरे, गिरीश महाजनांना धक्का

Jan 20, 2025 07:10 AM IST

Guardian minister appointment Cancelled : राज्यात रविवारी रात्री अचानक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या आहेत. नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद निवडीला स्थगिती देण्यात आली आहे.

महायुतीचा वाद चव्हाट्यावर! रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, आदिती तटकरे, गिरीश महाजनांना धक्का
महायुतीचा वाद चव्हाट्यावर! रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, आदिती तटकरे, गिरीश महाजनांना धक्का (Deepak Salvi)

Guardian minister appointment Cancelled : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच आहे. राज्यात पालकमंत्री पदावरून नाराजीचे वातावरण आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांची निवड होताच भरत गोगावले समर्थक आक्रमक झाले होते. तर नाशिकमध्येही दादा भुसे समर्थकांमध्ये नाराजी होती. अखेर रविवारी रात्री नवा जीआर काढत नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपद निवडीला स्थगिती देण्यात आली आहे.

राज्याच्या पळकमंत्र्यांची निवड गेल्या काही दिवसांपासून रखडली होती. त्यानंतर शनिवारी सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री निवडण्यात आले. ही यादी जाहीर झाल्यावर अनेक नाराजीनाट्य सुरू झाले. गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री करण्यात आले होते. यामुळे दादा भुसे नाराज झाले. तर, रायगडमध्ये अदिती तटकरे यांना पालकमंत्री दिल्याने भरत गोगवले नाराज झाले. रायगडमध्ये तर मोठा राडा झाला. पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाल्यावर रायगडमध्ये भरत गोगावले समर्थक आक्रमक झाले. त्यांनी थेट मुंबई गोवा मार्गावर येत टायर पेटवून रास्ता रोको आंदोलंन केले होते. तर दादा भुसे यांनी देखील नाराजी दर्शवली होती. त्यामुळे पालकमंत्री पदाची यादी जाहीर होताच एकाच दिवसांत दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ सरकारवर आली. या निर्णयामुळे महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. तर रायगडमधील राजकीय वाद देखील पुढे आला आहे.

तटकरे यांची वर्णी रायगडच्या पालकमंत्रीपदी लागल्यावर भरत गोगवले यांनी नाराजी व्यक्त केली होती. हा निर्णय धक्कादायक असल्याचं ते म्हणाले होते. मला पालकमंत्रीपद डावलने अपेक्षित नव्हते असे गोगावले म्हणाले होते. हा निर्णय मनाला न पटणारा असून यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा देखील झाली नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील असे देखील गोगावले म्हणाले होते. तर दादा भुसे यांनी देखील अशीच प्रतिक्रिया दिली होती.

काय आहे सरकारी आदेश ?

राज्यशासनाने काढलेल्या आदेशानुसार उक्त शासन निर्णयाद्वारे करण्यात आलेल्या नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात येत आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. या आदेशाच संकेतांक २०२५०११९२०५३२५५७०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढला गेला आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर