शिवनेरीच्या पायथ्याशी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर फाडले; पाच जणांना अटक-posters of prime minister narendra modi and chief minister eknath shinde were torn down near shivneri five people arrest ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवनेरीच्या पायथ्याशी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर फाडले; पाच जणांना अटक

शिवनेरीच्या पायथ्याशी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर फाडले; पाच जणांना अटक

Feb 19, 2024 11:09 AM IST

chief minister eknath shinde poster torn down near shivneri : किल्ले शिवनेरीवर आज ३९४ व्या जंयती सोहळ्या निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असून त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात बोर्ड लावण्यात आले होते. मात्र, हे बोर्ड काही अज्ञात व्यक्तिंनी फाडले.

chief minister eknath shinde were torn down near shivneri
chief minister eknath shinde were torn down near shivneri

chief minister eknath shinde poste were torn down near shivneri : किल्ले शिवनेरीवर आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९४ वा जयंती सोहळा साजरा केला जात आहे. या साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडावर आले असून त्यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला आहे. त्यांच्या स्वागतासाठी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे पोस्टर लावण्यात आले होते. मात्र, हे पोस्टर काही अज्ञात व्यक्तीने फाडून टाकल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तमाम महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान आणि आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३९४ वी जयंती आहे. यानिमित्ताने राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. किल्ले शिवनेरीवर आज शिवजन्माचा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील आदी नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी शिवनेरीच्या पायथ्याशी पोस्टर लावण्यात आले होते. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्या वतीनं हे पोस्टर लावण्यात आले आहेत. मात्र, यातील अनेक बोर्ड अज्ञाताकडून फाडण्यात आले.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना किल्ल्यावर येऊन देणार नाही असा इशारा मराठा मोर्चाच्या वतीने देण्यात आला होता. दरम्यान, या साठी किल्ल्यावर मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. दरम्यान, मराठा आंदोलकांना गडावर प्रवेश नाकारण्यात आल्याने आंदोलकामध्ये नाराजी होती. यातुन हे पोस्टर फाडण्यात आले असावे अशी माहिती आहे.

किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून तर किल्ले शिवनेरीच्या पहिल्या दरवाजापर्यंत गाडी रोडच्या कडेने असलेल्या विद्युत पोलवर हे पोस्टर लावण्यात आले होते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे . पी. नड्डा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो होते. मात्र, यातील अनेक बोर्ड हे फाडून टाकण्यात आले आहेत.

विभाग