Building Collapses in Bhendi Bazar : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार येथे आज शुक्रवारी मध्यरात्री सुमारास मोठी दुर्घटना घडली. येथील एक जुनी चार मजली इमारत अचानक कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवणीत हानी अथवा कुणी जखमी असल्याची माहिती नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार येथील निशानपाडा मार्गावर मध्यरात्री १२.३० च्या सुमारास एक चार मजली इमारत अचानक कोसळली. ही इमारत खूप जुनी आहे. ही इमारत जीर्ण झाल्याने या इमारतीत कुणी राहायला नव्हते. रात्री इमारत कोसळल्याने मोठा आवाज झाला. यामुळे नागरिक तातडीने घराबाहेर पडले. या घटनेची माहिती त्यांनी अग्निशामक दलाला दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक बचाव कार्य राबवण्यासाठी तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या.
तब्बल पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी बचाव कार्य राबवण्यास सुरुवात केली. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाने ढीगाऱ्या खाली कुणी दबले आहे का ? याचा शोध घेतला. पहाटे पर्यंत ढिगारा हटवण्याचे काम सुरू होते. या घटनेत अद्याप कुणी जीवित हानी अथवा जखमी असल्याचे वृत्त नाही.
कोसळलेली इमारत ही जीर्ण झाली होती. या इमारतीत कुणी राहायला नव्हते. ही इमारत धोकादायक होती. या इमारतीला तडे देखील गेले होते. या इमारतीचे नाव नूर व्हिला असून या इमारतीचे दुरुस्तीचे काम रखडले होते. मध्यरारी १२.३० च्या सुमारास या इमारतीचा मोठा भाग कोसळला, असे काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी सांगितले.
संबंधित बातम्या