Pune Porsche Accident : पुण्यात १९ मे रोजी झालेल्या कल्याणी नगर येथील पोर्शे अपघातात बिल्डर विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडले होते. यात दोघांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, नागरिकांनी आरोपीला पकडून येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळात हजर केले असता त्याला अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहून त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, यावरून मोठा गदारोळ झाला होता. यानंतर या प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या दोन सदस्यांच्या वर्तनाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीला या दोघांनी जामीन मंजूर केलेल्या १०० पानी अहवालात अनेक त्रुटी, गैरप्रकार आणि नियमांचे पालन न केल्याचे आढळून आले आहे.
अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा (वय २४) हे दोघे मित्रांसोबत जेवण आटोपून दुचाकीवरून घरी परतत असताना पुण्यातील कल्याणी नगर येथे १९ मे रोजी पहाटे भरधाव वेगाने आलेल्या पोर्शेने त्यांना धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला अपघात झल्यावर बाल हक्क न्याय मंडळात हजर करण्यात आले होते. यावेळी या मंडळाचे सदस्य एल. एन. धनवडे यांनी आरोपी मुलाला अपघातावर ३०० शब्दांचा निबंध जामीन मंजूर केला होता. या सोबतच वाहतूक व्यवस्थापन व समुपदेशन अशी किरकोळ शिक्षा सुनावली होती. या शिक्षेमुळे मोठी टीका झाली होती. यानंतर महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने या निर्णयाची चौकशी करण्यासाठी ५ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने तयार केलेल्या 100 पानी अहवाल सादर केला असून जामीन अहवालात अनेक चुका झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल महिला व बालविकास आयुक्तांना देण्यात आला आहे.
पाच सदस्यीय समितीने शुक्रवारी आपला अहवाल महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांना सादर केला. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महिला व बाल विकास विभागाने बाल न्याय मंडळाच्या दोन सदस्यांना नोटिसा बजावल्या आहेत, असे एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. हेही
बाल न्याय मंडळाच्या एका सदस्याने जामीन आदेश देताना अनेक त्रुटी आणि चुका केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मंडळाच्या दुसऱ्या सदस्याने दुसऱ्या सदशयाने या निर्णयाला संमती दिली होती, "दोन्ही सदस्यांकडून गैरवर्तन आणि नियमांचे पालन न केल्याचे आढळले आहे आणि त्यांना त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे," असे अधिकाऱ्याने सांगितले.
बाल न्याय मंडळात महिला व बालविकास विभागाने नियुक्त केलेले दोन सदस्य आणि न्यायपालिकेतील एका सदस्याचा समावेश असतो.
या बाबत महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले, चौकशी समितीने अहवाल सादर केला आहे. बाल न्याय मंडळाच्या दोन्ही सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्यांना पुढील चार ते पाच दिवसांत उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला बाल न्याय मंडळाने निरीक्षण केंद्रातील किशोरच्या कोठडीत २५ जूनपर्यंत वाढ केली होती. दरम्यान, धनवडे यांनी दिलेल्या उत्तरानंतर प्रशांत नारनवरे यांच्याकडून काय कारवाई केली जाईल या कडे लक्ष लागून आहे.
संबंधित बातम्या