मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune accident : सिम बदलत भाड्याच्या गाडीतून अनेक शहरांत केला प्रवास! पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला अशी झाली अटक

Pune accident : सिम बदलत भाड्याच्या गाडीतून अनेक शहरांत केला प्रवास! पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला अशी झाली अटक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 22, 2024 02:32 PM IST

Pune Porsche accident: पुण्यातील कल्याणी नगर येथील अपघातानंतर आरोपी वेदांत अगरवालचे वडील विशाल अगरवाल यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यावर बिल्डर विशाल अगरवाल हा फरार झाला होता. त्याला संभाजीनगर येथून अटक करण्यात आली होती.

 सिम बदललतं भाड्याच्या गाडीतून अनेक शहरात केला प्रवास! पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला अशी केली अटक
सिम बदललतं भाड्याच्या गाडीतून अनेक शहरात केला प्रवास! पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला अशी केली अटक

Pune Porsche accident: कल्याणी नगर येथे एका बड्या बिल्डरच्या मुलाने आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवत दुचाकीवरुण जाणाऱ्या दोघांना धडक दिली होती. हे प्रकरण दडपन्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला होत. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मुलाच्या वडील व बिल्डर विशाल अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. यानंतर विशाल अगरवाल हा फरार झाला होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अगरवालला मंगळवारी संभाजीनगर येथून अटक केली. विशाल अगरवाल याने पळून जाण्याची योजना आखली होती मात्र, त्या आधीच पोलिसांनी विशाल अगरवालच्या गाडीचे जीपीएस ट्रॅक करून आणि सीसीटीव्हीच्या मदतीने अटक केली.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Water And Orillia Pub : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील वॉटर आणि ओरीला पबवर पुणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाचा हातोडा

पुण्यात एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात गाडी चालवत दोघांच्या मृत्यू प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आरोपी मुलाच्या वडिलांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशाल अगरवाल असे या बिल्डरचे नाव असून विशाल अगरवालने या प्रकरणी फरार होण्याची योजना आखली होती. परंतु पोलिसांनी विशाल अगरवाल याला अटक केली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला कार दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. विशाल अगरवाल विरोधात बाल न्याय कायद्याच्या कलम ७५ आणि ७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय आयपीसीची अनेक कलमेही लावण्यात आली आहेत. एवढेच नाही तर या प्रकरणात आरोपी अल्पवयीन मुलावरही प्रौढ म्हणून खटला चालवावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. विशाल अगरवालवर गुन्हा दाखल होताच त्याने पुण्यातून पळून जाण्याचा प्लॅन आखला होता.

Pune viral News : झाडाच्या फांद्या कापायला गेला अन् अडकून पडला! पुण्यात झाडावर अडकलेल्या व्यक्तीची 'अशी' झाली सुटका

व्यवसायाने बिल्डर असलेल्या अगरवालने पळून जाण्याची संपूर्ण योजना आखली होती. त्याने आपली कार घरी सोडली आणि दुसरी गाडी ही मुंबईला सोडण्यास सांगितली. यानंतर त्याने त्याच्याच दुसऱ्या ड्रायव्हरला तिसरी गाडी ही गोव्याला नेण्यास सांगितले. दरम्यान या गाडीतून मुंबईला जाताना तो गाडीतून मध्येच उतरला आणि त्यानंतर मित्राच्या गाडीत बसून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाला. त्याने अनेक सीमकार्ड देखील घेतले आणि त्यावरून संपर्क साधत होता. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी विशाल अगरवालने अनेक गाड्यांचा वापर केला. तर पोलिसांना त्याचा माग काढता यावा म्हणून त्याने मोबाईलमध्ये दुसरे सिमही टाकले होते.

Prashant kishor : नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास पेट्रोल, डिझेलवरही जीएसटी लागणार; प्रशांत किशोर यांचा अंदाज

पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे वडील मित्राच्या कारमध्ये असल्याची माहिती मिळाल्यावर आम्ही जीपीएसद्वारे त्याचा माग काढण्यास सुरुवात केली. यानंतर पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने रस्त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासून विशाल अगरवालची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. यात त्यांची ओळख पटल्यावर विशाल अगरवाल हे संभाजीनगर येथे पोहोचले. विशाल अगरवाल ज्या ठिकाणी लपला होता त्या ठिकाणी पुणे पोलिसांच्या पथकाने रात्री छापा टाकून त्याला अटक केली. त्याला मंगळवारी रात्री वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. तर रात्री फरासखाना पोलिस ठाण्यात पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते.

आरोपीला १५ तासात जामीन मिळाल्याने संताप

याप्रकरणी संपूर्ण देशभरात संताप पसरला आहे. आरोपीला अल्पवयीन असल्याने त्याला १५ तासांत जामीन मिळाला. याशिवाय शिक्षेच्या नावाखाली अपघातावर निबंध लिहा आणि १५ दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करा, असे सांगण्यात आले. याशिवाय दारूपासून दूर राहण्यासाठी समुपदेशन घेण्यास सांगितले. आता पोलिसांनी बाल न्याय मंडळाशी संपर्क साधून १७ वर्ष ८ महिन्यांच्या किशोरवर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी केली आहे. आज पोलिसांच्या या अर्जावरही निर्णय होऊ शकतो. या अपघातात मध्य प्रदेशातील रहिवासी असलेला अनिश आवडिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग