pune Porshe case : पुण्यातील कल्याणीनगर येथे२० मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अलिशान पोर्श कार भरधाव चालवून दोघांना चिरडून मारणाऱ्या अल्पवयीन मुलाबाबत आता मुंबई उच्च न्यायालयाने आपले मत व्यक्त केलं आहे. कारच्या धडकेत एक तरुण व तरुणी ठार झाली होती. अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा असे या दोघांची नावे आहेत. अश्विनी आणि अनिशच्या कुटुंबाने आम्हाला न्याय द्या, अशी मागणी केली असताना मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी मुलाबाबत भाष्य करताना म्हटलं की, त्याला धक्का बसला आहे, त्यांच्या मानसिकेतवरही परिणाम झाला आहे.
अल्पवयीन मुलाला जामीन मिळाल्यानंतरही त्याला बेकायदेशीररित्या बालसुधारगृहात डांबल्याचा आरोप मुलाच्या आत्याने उच्च न्यायालयात केला आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठानं यावर सुनावणी घेत न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. आता यावर येत्या मंगळवारी सुनावणी होणार आहे. अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाल्यानंतर त्याला कुठल्याप्रकारच्या कस्टडीत ठेवलंय, असा सवाल हायकोर्टानं केला आहे.
यावर सरकारी वकिल हितेन वेणेगावकर यांनी उत्तर दिले आहे. याप्रकरणात हिबियस कॉर्पस (Hebious corpus ) दाखल होऊ शकत नाही, असा दावा त्यांनी केला आहे. सरकारी पक्षानं सांगितलं की, आजवर कुणीही आमच्याकडे मुलाची कस्टडी मागितली नाही. रक्ताचे सर्व नातेवाईक कोठडीत आहेत. त्याचबरोबर मुलाला दारूचं व्यसन आहे , मुलाची मानसिकस्थिती ठीक नाही,बाहेर त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो, असं राज्य सरकारनं हायकोर्टात सांगितलं.
आरोपी मुलाची आत्या व विशाल अग्रवाल यांची दिल्ली येथील बहिण पूजा जैन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीय. याचिकाकर्त्यांच्यावतीनं आभात पोंडा यांनी जोरदार युक्तिवाद करत जामीन मिळालेल्या अल्पवयीन आरोपीला पुन्हा कस्टडीत घेणं पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं कोर्टात सांगितलं. अल्पवयीनं आरोपींना जामीन देऊन त्यांना सुधारण्याची संधी मिळायला हवी,असं कायदा सांगतो. मात्र त्याला बालसुधारगृहाला त्याची कस्टडी कशी काय दिली जाऊ शकते?,असा सवाल याचिकाकर्त्यांनी केली आहे.
१७ वर्षे आठ महिने वय असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत ताशी १६० किमीच्या वेगाने पोर्श कार चालवून एका तरुण तरुणीला उडवले होते. ही धडक इतकी जोरात होती की यातील तरुणी हवेत उडून रस्त्यावर आपडली होती. तिचा जागीच मृत्यू झाला होता तर तरुणाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.
मृत तरुण-तरुणी पुण्यात एका आयटी कंपनीत काम करत होता. त्या रात्री दोघे मित्राच्या वाढदिवसानिमित्त रात्री डिनरला गेला होते. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बाईकवरुन परतताना भरधाव वेगात आलेल्या पोर्शने या दोघांना धडक दिली. ज्यात या दोघांचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या