Pooja Khedkar : यूपीएससीच्या विरोधात पूजा खेडकर हिची दिल्ली हायकोर्टात धाव; आयोगाच्या नोटिशीला दिलं आव्हान-pooja khedkar moves delhi high court against upsc decision of cancellation of candidature as trainee ias gave show cause ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pooja Khedkar : यूपीएससीच्या विरोधात पूजा खेडकर हिची दिल्ली हायकोर्टात धाव; आयोगाच्या नोटिशीला दिलं आव्हान

Pooja Khedkar : यूपीएससीच्या विरोधात पूजा खेडकर हिची दिल्ली हायकोर्टात धाव; आयोगाच्या नोटिशीला दिलं आव्हान

Aug 05, 2024 11:42 AM IST

Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी यूपीएससीने रद्द केली होती. तसेच त्यांना कारने दाखवा नोटिस देखील आयोगाने बजावली होती. लोकसेवा आयोगाच्या या निर्णयाविरोधात पूजा खेडकरने दिल्ली हाय कोर्टात धाव घेतली आहे.

यूपीएससीच्या विरोधात पूजा खेडकर हिची दिल्ली हायकोर्टात धाव; आयोगाच्या नोटिशीला दिलं आव्हान
यूपीएससीच्या विरोधात पूजा खेडकर हिची दिल्ली हायकोर्टात धाव; आयोगाच्या नोटिशीला दिलं आव्हान

Pooja Khedkar : वादग्रस्त पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट पुढे आली आहे. यूपीएससीने पूजा खेडकर यांनी गैरप्रकार करत चुकीचे दाखले देऊन आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांचे पद रद्द करत त्यांना सेवेतून बडतर्फ केले होते. तसेच पूजा खेडकरला कारने दाखवा नोटिस देखील बजावण्यात आली होती. आता आयोगाच्या या निर्णयाविरोधात पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे.

काय आहे प्रकरण ?

पूजा खेडकर यांनी आयएएस पदासाठी चुकीच्या पद्धतीने दाखले मीवळले होते. या प्रकरणी चौकशी समितीने तपास केल्यावर पूजा खेडकर या दोषी आढळल्या होत्या. यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकरची उमेदवारी रद्द करत त्यांना सेवेतून बडतर्फ केले होते. या सोबतच यूपीएससीनं भविष्यातील सर्व परीक्षा/निवडींमधून देखील खेडकर यांना बाद करण्यात आले होते. या प्रकरणी यूपीएससीने पूजा खेडकर यांना ३० जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ दिली होती. मात्र, त्याचं उत्तर पूजा खेडकर यांनी न दिल्यामुळे यूपीएससीने त्यांच्या विरोधात ही कारवाई करत त्यांचे निलंबन केले होते.

पूजा खेडकर हिने नावात चुकीच्या आणि गैरमार्गाने फेरफार करत तब्बल सात वेळा यूपीएससीची परीक्षा दिली. त्यांनी इंग्रजी भाषेमधून नाव देताना त्यांच्या नावाचे स्पेलिंग देखील बदलले. या प्रकरणी दिल्ली पोलिस तपास करत असून यात अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत. पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षा देण्यासाठी वडिलांच्या नावांमध्ये सुद्धा फेरफार केला आहे. तर आई वडिलांचा खोटा घटस्फोट देखील दाखवल्याचं पुढं आलं आहे.

पुजा खेडकर फरार

दरम्यान, या प्रकारानंतर पूजा खेडकर फरार आहेत. यूपीएससीच्या कारवाईनंतर पुणे पोलीसांसह दिल्ली पोलिस पूजा खेडकरचा शोध घेत आहे. पूजा खेडकर यांनी खोटे दिव्यांग पत्र देऊन पद मिळवल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे. पूजा खेडकर या ट्रेनी असतांना त्यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशन अधिकारी म्हणून काम करत होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या आलीशान मोटरीवर अंबर दिवा लावला होता. तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बड्या अधिकाऱ्याची केबिन देखील त्यांनी बळकावली होती. कार्यालयात असतांना त्यांच्या वागणुकीमुळे अधिकारी देखील वैतागले होते. यामुळे, जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी त्यांच्या विरोधात राज्य शासनाला आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाला अहवाल पाठवला होता. त्यानंतर त्यांची बदली ही वाशिम येथे करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी केलेले अनेक गैरप्रकार हे उघडकीस आले होते.

विभाग