Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अजित पवारांच्या बैठकीला ‘या’ ५ आमदारांची दांडी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अजित पवारांच्या बैठकीला ‘या’ ५ आमदारांची दांडी

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अजित पवारांच्या बैठकीला ‘या’ ५ आमदारांची दांडी

Jun 06, 2024 11:05 PM IST

NCP MLA Meeting : अजित पवारांनी आज बोलावलेल्या पक्षातील आमदारांच्या बैठकीला ५ आमदारांनी दांडी मारल्याने महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूंकप होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

अजित पवारांच्या बैठकीला ‘या’ ५ आमदारांची दांडी
अजित पवारांच्या बैठकीला ‘या’ ५ आमदारांची दांडी

लोकसभा  निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वातील एनसीपी अजित पवार गटात भूकंप होण्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. राष्ट्रवादी  शरदचंद्र पवार गटाने राज्यात १० उमेदवार उभे केले होते, त्यातील ८ जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे अजित पवार गटाच्या खात्यात केवळ १ जागा गेली आहे. राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. आता येत्या सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असून अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू आहे.

दरम्यान, अजित पवारांनी आज आपल्या पक्षातील आमदारांची बैठक बोलावली होती. यात ५ आमदारांनी दांडी मारल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत आमदारांच्या अनुपस्थितीवरून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांचा बाजार गरम झाला आहे. 

लोकसभा निवडणुकीनंतर आता अजित पवार पक्ष वाचवण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचबरोबर अजित पवार गट आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागला आहे. यामध्ये राष्ट्रवादीत जोरदार हालचाली होत आहेत.

अजित पवार गटातील मंत्र्यांची आज (गुरुवारी) अजित पवार यांचे सरकारी निवासस्थान ‘देवगिरी’ बंगल्यावर बैठक झाली. त्यानंतर ट्रायडेंट हॉटेलमध्ये सर्व आमदारांची बैठक बोलावली गेली. या बैठकीला ५ आमदार अनुपस्थित राहिल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान पाच आमदार अनुपस्थित राहिल्याची कारणे वरिष्ठ नेत्यांनी दिली आहेत. मात्र राजकीय वर्तुळात आमदारांची दांडी चर्चेचा विषय ठरली आहे.

अजित पवार गटाच्या बैठकीला कोणत्या आमदारांची दांडी?

आज अजित पवार गटाच्या आमदारांच्या बैठकीला ५ आमदार अनुपस्थित राहिले. मिळालेल्या माहितीनुसार आमदार नरहरी झिरवळ, सुनील टिंगरे, राजेंद्र शिंगणे, अन्ना बनसोडे  आणि धर्मराव बाबा अत्राम बैठकीत हजर नव्हते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत या गोष्टीवर चर्चा झाली की, लवकरात लवकर कॅबिनेट विस्तार केला जावा. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील अपयशावरही चर्चा झाली.

अजित पवार गटातील नाराज आमदारांनी सुप्रिया सुळे यांना संपर्क केल्याचा दावा रोहित पवार यांनी केल्याने खळबळ माजली होती. या  पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने आज आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत ५ आमदारांनी दांडी मारल्याने आमदार सोडून जाण्याच्या वावड्या उठू लागल्या. दरम्यान बैठकीला गैरहजर राहणाऱ्या आमदारांनी बैठकीला गैरहजर राहण्यावरुन स्पष्टीकरण दिलं आहे.

आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्ष नेत्यांना कळवले आहे की, ते आजारी आहेत. त्यामुळे पक्षाच्या बैठकीला येणार नाहीत. आमदार नरहरी झिरवळ रशियाला गेले आहेत. आमदार सुनील टिंगरेही बाहेर कोठेतरी गेले आहेत.  राजेंद्र शिंगणे यांनी पक्षाला कळवले आहे की, ते आजारी आहेत. पिंपरी चिंचवडचे आमदार अन्ना बनसोडे यांनी व्यक्तगत कारणास्तव बैठकीला हजर नसल्याचे सांगितले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर