मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kolhapur Crime : शेतकऱ्याला मागितली एक कोटीची लाच; खाकीला डाग लावणाऱ्या पोलिसाच्या मुसक्या आवळल्या!

Kolhapur Crime : शेतकऱ्याला मागितली एक कोटीची लाच; खाकीला डाग लावणाऱ्या पोलिसाच्या मुसक्या आवळल्या!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 10, 2022 03:28 PM IST

Kolhapur Crime News : शेतजमिनीचा निकाल शेतकऱ्याच्या बाजूनं लावून देण्यासाठी एका पोलिसांनच चक्क एक कोटीची लाच मागितल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे.

Kolhapur Crime News
Kolhapur Crime News (HT_PRINT)

Kolhapur Crime : शेतकऱ्याला जमीनीचा व्यवहाराचा निकाल त्याच्या बाजूनं लावण्यासाठी एका पोलिसांनं तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागितल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. आरोपी पोलीसानं काही दिवसांपूर्वीच एका मुलीचं अपहरण केलं होतं, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून आता लाचलूचप विभागानंही खाकीला डाग लावणाऱ्या पोलिसाच्या अटकेची कारवाई सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर पोलिसांनी निलंबित केलेल्या पोलिस नाईक जॉन विलास तिवडे यानं पुणे जिल्ह्यातील देहूरोडमधील एका शेतकऱ्याला जमीनीचा व्यवहार तुमच्या बाजूनं लावून देतो, असं सांगत एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. याशिवाय त्यानं काही दिवसांपूर्वी एका मुलीचंही अपहरण केलं होतं, त्यामुळं आता आरोपीला जॉनला सांगली पोलिसांकडून अटक करण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास करायला सुरुवात केली आहे.

याशिवाय शेतजमिनीच्या दाव्याचा निकाल बाजूनं लावून देण्यासाठी जॉननं पुण्यातील एका शेतकऱ्याकडं एक कोटींची मागणी केली होती. त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांचा निलंबित अंगरक्षक असलेल्या जॉनविरोधात कोल्हापूरच्या शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा शेतजमिनीवरून कोर्टात वाद सुरू आहे. त्यात त्यानं एका शेतकऱ्याला प्रशासकीय सदस्य माजी जिल्हाधिकारी माने यांना सांगून तुमचं काम करून देतो, मला एक कोटी द्यावे लागतील, असं म्हणत लाचेची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणाची तक्रार केली होती. त्यावरून आता आरोपी माजी पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधीच आरोपी जॉनला मुलीच्या अपहरणाच्या केसमध्ये अटक करण्यात आली असून आता लाच प्रकरणातही त्याच्याविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या