Policemans Son Ends Life in Pune : पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकत अण्णा गुंजाळ यांनी लोणावळ्यात टाय़गर पाईंटजवळ झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज (शनिवार) शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या एका पोलिसाच्या मुलाने गळफास घेऊन जीवन संपवले. सध्या व्हेंलटाईन वीकला सुरू असून आठवडाभर अनेक दिवस साजरे केले जात असतानाच पुण्यात एका महाविद्यालयीन तरुणाने प्रेमभंगातून आपले जीवन संपल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घटना घडली आहे. ऋषिकेश कोकणे (वय १९) असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. प्रेमभंग झाल्यामुळे त्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सांगितलं जात आहे. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडीओ सुद्धा तयार केला होता. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
शिवाजीनगर पोलीस वसाहतीमध्ये राहणारे सहाय्यक उपनिरीक्षक दादा कोकणे यांचा मुलगा ऋषिकेश कोकणे आज घरात एकटात होता. त्यावेळी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास त्याने घरात गळफास घेऊन जीवन संपवले. घरी कुणी नसल्याचं पाहून ऋषिकेशने रुममध्ये पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेतला.
सायंकाळी कुटूंबीय आले मात्र बराच वेळ झाला तरी ऋषिकेश त्याच्या रुममधून बाहेर येत नसल्यामुळे त्याने त्याला आवाज दिला. तून काहीच प्रतिसाद येत नसल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आतील दृष्य पाहून त्यांना धक्का बसला. ऋषिकेशने पंख्याला गळफास घेतल्याचं आढळून आलं. त्याला खाली उतरून तातडीने रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या रुमची पाहणी केली. पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ सापडला आहे. त्यावरून प्रेमभंगाच्या नैराश्येतून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ऋषिकेश बीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. १९ वर्षीय मुलाचा मृत्यूने कुटूंबाला धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास शिवाजीनगर पोलीस करत आहे.
संबंधित बातम्या