Savitribai phule Pune University Lalit Kala Kendra : पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात नाटक सादर करतांना रामायनातील काही दृश्य दाखवल्याने भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी ललित कला केंद्रात तोडफोड केली यावेळी बांदोबस्तावर असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाने ही बाब नियंत्रण कक्ष किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली नाही. तसेच आवश्यक पावले देखील उचलली नाही. यामुळे संबंधित पोलिस उपनिरीक्षकाला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
चतु:शृंगी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सचिन शंकर गाडेकर असे निलंबित उपनिरीक्षकाचे नाव आहे. ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रामायणवर आधारित नाटक सादर केले. जब वी मेट असे या नाटकाचे नाव असून नाटकात विडंबनाच्या नावाखाली अश्लील शब्द वापरुन हिंदू देव देवतांच्या तोंडी आक्षेपार्ह मजकूर देखील वापरण्यात आला होता. यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाटक बंद पाडले होते. तर ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांना देखील मारहाण करण्यात आली होती.
दरम्यान, शनिवारी (दि ३) भाजप युवा मोर्चा आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ललित कला केंद्राच्या आवारत घुसत प्राध्यापकांच्या विरोधात घोषणा बाजी करून शाई फेक आणि आवरात तोडफोड केली होती. खिदइकीच्या काचा फोडून कुंड्या देखील फोडल्या होत्या. यावेळी बंदोबस्तासाठी उपनिरीक्षक गाडेकर तैनात होते.
नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ‘शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याला सर्वोच्च प्राधान्य असेल,’ असे माध्यमांना सांगितले होते. मात्र ते रुजू होत नाही त्याच्या काही कालावधीतच विद्यापीठात मोठा राडा झाला. यावेळी बंदोबस्तावर गाडेकर होते.
त्यांनी यावेळी योग्य पावले उचलली नाही. तसेच यांची माहिती कंट्रोल रूम अथवा वरिष्ठांना दिली नाही. त्यामुळे गाडेकर यांच्यावर निळंबनाची कारवाई करण्यात यावी असे आदेश पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले. जबाबदार पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असताना कर्तव्यात कसुरी केली. अशा प्रकारच्या बेजबाबदारपणामुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
ललित कला केंद्राच्या तोडफोडीप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भारतीय जनता युवा मोर्च्याच्या तब्बल १९ करकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता युवा मोर्च्याच्या करकर्त्यांनी पुणे विद्यापीठातून पदयात्रा काढत या घटनेचा निषेध केला आहे.