PSI Dead Body Found In Koregaon Park Pune : पुण्यात कोरेगाव पार्क येथून एक धक्काडेक घटना उघडकीस आली आहे. कोरेगाव पार्क परिसरातील लेन नं. ७ मध्ये एका पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या पोलीसाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा झालेला नाही. हा घातपात आहे की हत्या या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत.
दत्तात्रय कुरळे असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते पुणे पोलिस दलात मोटर परिवहन विभागात कार्यरत होते. शनिवारी सकाळी११ च्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क परिसरात पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. एका स्पा सेंटरच्या बाहेर त्यांचा मृतदेह आढळला होता. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते या घटनास्थळी गेल्या. त्यांनी घटणस्थळांचा पंचनामा केला आहे. कुरळे यांच्या मृत्यूमागचे कारण गुलदस्त्यात असून त्यांचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर कुरळे यांचा मृत्यू नेमका कसं झाला याचे कारण समजणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
पुण्यात स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने एका माहीलेची तब्बल ६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. भामट्याणे सोन्याचा खोटा हार देऊन ही फसवणूक केली. या प्रकरणी खिलारेवाडी, कर्वेरोड येथे राहणाऱ्या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार राजू प्रतापती व त्याच्यासोबत असलेल्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या