Nagpur Crime News Marathi : प्रेमप्रकरणातून एका तरुणीला इन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज करून शिवीगाळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरातून समोर आला आहे. ब्रेकअप झाल्यानंतर तरुणीने बोलण्यास नकार दिल्यामुळं आरोपीने अश्लील मेसेज केले आहे. त्यानंतर आता या प्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या अटकेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. प्रेमप्रकरण कुटुंबियापर्यंत पोहचल्यामुळे तरुणीने अचानक दुरावा केला होता. तरुणाची समजूत घालूनही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळं वाद पेटताच पीडितेने आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील ओंकारनगर परिसरात राहणाऱ्या प्रयास सुके या तरुणाचं कॉलनीतील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. दररोज इन्स्टाग्रामवर चॅटिंग सुरू असताना याची खबर तरुणीच्या कुटुंबियांना लागली. त्यामुळं तरुणीने बॉयफ्रेंडचे मेसेज आणि कॉलला प्रतिसाद न देण्याचा निर्णय घेतला. परंतु तरीदेखील आरोपी सतत अश्लील मेसेज करत असल्याने पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपीच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. ओंकारनगर परिसरातील या घटनेमुळं नागपुरात खळबळ उडाली असून शाळकरी मुलींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
आरोपी तरुणाने पीडितेला अश्लील मेसेज केला असताना तरुणीने आरोपीला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केलं होतं. त्यानंतर आरोपीने दुसरे अकाउंट ओपन करत पीडितेला अश्लील मेसेज केले. पीडितेच्या मैत्रिणीलाही आरोपीने अश्लील मेसेज केले असून त्यानंतर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. नागपुरातील हुडकेश्वर पोलिसांनी आरोपींची शोधमोहिम सुरू केली आहे.