Lonavla Crime : लोणावळा येथे एका बांगल्यात मोठ्याने साऊंड सिस्टिम लावून काही नृत्यांगणांकडून अश्लील डान्स करून घेत धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लोणावळा पोलिसांनी कारवाई करून नृत्यांगना आणि ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
लोणावळा हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. या ठिकाणी शनिवारी आणि रविवारी सुट्टी घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. या साठी या परिसरात असणारे अनेक बंगले भाड्याने घेऊन पार्ट्या केल्या जातात. हा भाग दुर्गम असल्याने अनेकांचे फावते व या ठिकाणी अनेक गैर प्रकार देखील चालतात.
लोणावळ्यात प्रामुख्याने मुंबई, पुणे आणि आसपासच्या परिसरातील नागरिक येत असतात. या ठिकाणी अनेक बड्या व्यक्तिंची बंगले आणि हॉटेल आणि रिसोट आहेत. हे बंगले, घरे आणि रिसोट भाड्याने दिले जातात. या ठिकाणी बाहेरील आणि परदेशातील पर्यटक येऊन पर्यटनाचा आनंद देखील घेतात. मात्र, बंगला भाड्याने घेऊन अनेक जण बेकायदेशीर कृत्य करत असल्याच्या अनेक घटना पुढे आल्या आहेत. काही जणांनी लोणावळ्यातील तुंगार्ली येथे एक बंगला भाड्याने घेऊन या ठिकाणी नृत्यांगना बोलवल्या होत्या.
बंगल्याच्या आवारात मोठ्याने साऊंड सिस्टिम लाऊन त्यांच्याकडून अश्लील नृत्य करून त्यांच्या भोवती आरोपी दारू पिऊन नाचत होते. ही बाब पोलिसांना कळली. यावेळी त्यांनी या बंगल्यावर धाड टाकत नाचणाऱ्या मुली आणि ९ जणांना अटक केली. रात्री उशिरापर्यंत मोठ्याने गाणी वाजवून इतरांना त्रास दिल्याने ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई देखील रात्री उशिरा सुरू होती.
या घटनेची गंभीर दाखल लोणावळा पोलिसांनी घेलती आहे. आता या पुढे लोणावळा आणि परिसरातील बंगले भाड्याने देताना पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच बंगल्यावर बेकायदेशीर कृत्य होणार नाही, याची काळजी घेऊन याची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. असे न केल्यास बंगला मालकांवर कारवाई करण्याचा इशारा सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिला आहे.